मुंबईत सुवर्णकार संघाच्या हिरक महोत्सवानिमित्त ६० वा वर्धापन दिन साजरा…
प्रतिनिधी-महेश वैद्य
मुंबई: मुंबई सुवर्णकार संघाच्या वतीने शुक्रवार दिनांक 31 मार्च 2023 रोजी महाराष्ट्र प्रदेश सुवर्णकार संघाच्या हिरक महोत्सवी 60 वा वर्धापन दिन मुंबई सुवर्णकार संघाचे कार्यालय 63 A कांचवाला बिल्डिंग,1 ला माळा, रूम नंबर 13, धनजी स्ट्रीट,मुंबई सुवर्णकार संघ चौक जव्हेरी बाजार मुंबई नंबर 400003 येथे साजरा करण्यात आला.



कार्यक्रमाची सुरुवात अखिल भारतीय सुवर्णकार संघाचे उपाध्यक्ष श्री.नितीन मसुरकर,महाराष्ट्र प्रदेश सुवर्णकार संघाचे कार्याध्यक्ष श्री.अदिप वेर्णेकर,सरचिटणीस श्री.अनिल कारेकर,खजिनदार श्री.संजय पितळे, सुवर्णकार प्रभात मासिकाचे संपादक श्री.सुनिल देवरुखकर यांनी दिप्रज्वलन करून महाराष्ट्र प्रदेश सुवर्णकार संघाचे संस्थापक मान्यवर स्व.सुयकांतजी वगळ,स्व.नारायण मिर्लेकर, स्व. काका गवाणकर ,स्व.सखाराम बेलवलकर यांच्या प्रतिमेस पुष्पमाला अर्पण करून स्वर्गीय नेत्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.


मुंबई सुवर्णकार संघाचे सरचिटणीस श्री अदिप वेर्णेकर यांनी महाराष्ट्र प्रदेश सुवर्णकार संघाच्या स्थापनेपासून आज पर्यंतच्या कार्याचा थोडक्यात आढावा घेतला व सर्व सुवर्णकार बांधवांनी हॉलमार्क रजिस्ट्रेशन करून आपल्या व्यवसायाची उन्नती करावी असे सांगितले.महाराष्ट्र प्रदेश सुवर्णकार संघाचे नव निर्वाचित सरचिटणीस श्री अनिल कारेकर यांनी सुवर्णकारांच्या ज्वलंत समस्या मांडून त्या सोडविण्याचा प्रयत्न करू असे सांगितले.महाराष्ट्र प्रदेश सुवर्णकार संघाचे खजिनदार श्री संजय पितळे यांनी सुवर्णकारानी केवळ गरजेपुरते संघटनेची आठवण न करता संघटनेशी नेहमीच वर्गणी भरून संघटनेच्या संपर्कात राहावे असे सांगितले.
सुवर्णकारांचे मासिक सुवर्णकार प्रभात मासिकाचे संपादक श्री सुनिल देवरुखकर यांनी बदलत्या काळाची आठवण करून देताना सुवर्णकारांचा दिल्ली च्या आंदोलनाची माहिती देतेवेळी तत्कालीन पंतप्रधान स्व.इंदिरा गांधी या सुवर्णकारांच्या सामोऱ्या येऊन त्यांनी सुवर्णकारांच्या समस्या ऐकून घेतल्या. व त्या सोडविण्याचे आश्वासन दिले त्याबाबतचा फोटो देखील उपलब्ध आहे असे सांगितले .
अखिल भारतीय सुवर्णकार संघाचे उपाध्यक्ष श्री नितीन मसुरकर यांनी आपल्या मार्गदर्शन भाषणात सुवर्णकारानी सरकारकडून येणाऱ्या नवीन समस्यांना न घाबरता त्याला सामोरे जाण्याचे ध्येय ठेऊन आपल्या व्यवसायाची उन्नती करावी आपल्या समस्या सोडविण्यासाठी संघटना सज्ज असल्याचे सांगितले.
श्री.दिलीप घोसाळकर,संजय गोरीवले, सत्यविजय कारेकर,विठ्ठल ताटोला, अशोक सोनी यांनी आपआपल्या विभागाकडून महाराष्ट्र प्रदेश सुवर्णकार संघाच्या हीरक महोत्सवी वर्षानिमित्त शुभेच्छा दिल्या.त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते हीरक महोत्सवी वर्धापन दिनाचा केक कापण्यात आला. राष्ट्रगीता नंतर अल्पोहार करण्यात आला.
या कार्यक्रमास सत्यविजय मोंडकर ,सुनिल वेदपाठक ,अमोल नारकर, नरेश टेमकर, रविंद्र देवरुखकर,संतोष पोसकर,राजेश एकबोटे, राजन देवरूखकर,शैलेश कारेकर,संतोष कुळे,प्रदिप जामसंडेकर,देविदास नाचरे,महेंद्र म्हाशेळकर (माणगाव),संतोष बैकर,शशांक पिसाट,रुपेश खराडे,रोहित पेडणेकर,लक्ष्मण मानकर,सौ.तृप्ती वेर्णेकर ,सौ.संजना मोंडकर,अश्विनी गायकवाड, कु.सोनल जाधव यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला.सौ. दीव्या रायकर यांनी खास केक करून आणला.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com