कासा पोलीस ठाणे यांचेकडून दरोड्याच्या तयारीत असलेल्या आरोपींना मुद्देमालासह अटक…

प्रतिनिधी-मंगेश उईके
पालघर:-कासा पोलीस ठाणे हद्दीतून मुंबई-अहमदाबाद महामार्ग क्रमांक-४८ हा जात असून सदरचे महामार्गावर या अगोदर मेंढवण घाट तसेच इतर ठिकाणी दरोडा घालून प्रवांशांना लुटण्याचे प्रकार घडत होते. श्री. बाळासाहेब पाटील, पोलीस अधीक्षक, पालघर यांनी सदर बाबींनवर विशेष लक्ष देऊन भविष्यात अशा अप्रीय घटना घडू नयेत या करीता मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर सतर्क गस्त करुन विशेष लक्ष ठेवणेबाबत सुचना देण्यात आल्या होत्या.
दिनांक ०२/०४/२०२४ रोजी श्री संजयकुमार ब्राम्हणे, जव्हार पोलीस ठाणे यांना गोपणीय माहिती मिळाली की, मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरून दरोडा घालण्याच्या उद्देशाने एक मारुती सुझुकी कंपनीची स्विफ्ट कार क्रमांक MH-14-CX-5037 हि येत आहे. मिळालेल्या गोपनीय माहीतीच्या आधारे पोनि/नामदेव बंडगर, प्रभारी अधिकारी, कासा पोलीस ठाणे तसेच कासा पोलीस ठाणेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी मुंबई-अहमदाबाद महामार्ग क्रमांक-४८ वरील मौजे घोळ गावचे हद्दीतील चारोटी टोलनाका येथे पाळत ठेवून मिळालेल्या माहीतीच्या आधारे पहाटे ०४.०० वा. चे. सुमारास एका मारुती सुझुकी कंपनीच्या पांढऱ्या रंगाच्या स्विफ्ट कार क्रमांक- MH-14-CX-5037 ला शिताफीने थांबविले असता त्यामधील दोन इसम हे अंधाराचा फायदा घेवून गाडीमधून पळून गेले. स्विफ्ट चालक नामे १) जमील सलीम शेख वय ३४ वर्षे, रा. मेट्रो हॉटेल जवळ नदीनाकाभिवंडी, ता. भिवंडी, जि. ठाणे, मुळ रा. लामजना, ता. औसा, जि. लातुर, २) कुमैल शमीम शा वय २० वर्षे, रा. इदगाह रोड, आयटीआयकॉलेज जवळे, भिवंडी, ता. भिवंडी, जि. ठाणे, मुळ रा. जौनपुर, शहागंज, बडेगाव, राज्य उत्तरप्रदेश, ३) जमील चांद शेख वय २४ वर्षे, रा. सलाटर हाऊस रुमनं. ८०३ भिवंडी, ता. भिवंडी, जि. ठाणे, मुळ रा. मेहकर, मोटीचीक पोलीसचौकी, जि
बुलढाणा यांना पकडण्यात यश आले. सदर वेळी कारची पाहणी केली असता कारमध्ये दरोडा घालण्याच्या अनुषंगाने लागणारे साहीत्य त्यामध्ये एक लोखंडी कटावनी, एक भरीव लाकडी दांडका, प्लास्टीकचे पिशवीत मिरची पावडर तसेच हातात मावतील असे ८ दगड मिळून आल्याने पंचांसमक्ष जप्त पंचनामा करुन पोलीस अंमलदार बक्कल क्रमांक ११५७ भरत नारायण शिंदे, नेमणुक कासा पोलीस ठाणे, याचे तक्रारी वरुन कासा पोलीस ठाणे गुन्हा रजि. नं. ९०/२०२४ भा.द.वि.स.कलम ३९९, ४०२ प्रमाणे दिनांक ०२/०४/२०२४ रोजी १५.११ वाजता गुन्हा दाखल करण्यात आलेला असून वर नमुद तीनही आरोपींना गुन्हयात अटक करण्यात आली आहे.
सदर गुन्हयाचा पुढील तपास पो.निरी नामदेव बंडगर यांचे मार्गदर्शनाखाली पो.उप. निरी/संदिप नागरे कासा पोलीस ठाणे हे करीत आहेत.
सदरची कामगिरी ही श्री. बाळासाहेब पाटील, पोलीस अधीक्षक, पालघर, श्री. पंकज शिरसाट, अपर पोलीस अधीक्षक पालघर, तसेच श्री. गणपत पिंगळे उप विभागिय पोलीस अधिकारी, जव्हार विभाग, श्रीमती अंकीता कणसे उपविभागीय पोलीस अधिकारी, डहाणू विभाग, पोलीस निरीक्षक श्री अनिल विभुते, स्थानीक गुन्हे शाखा पालघर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री नामदेव बंडगर, प्रभारी अधिकारी कासा पोलीस ठाणे, पोलीस निरीक्षक श्री संजयकुमार ब्राम्हणे, जव्हार पोलीस ठाणे, पोहया/विटकर, पोना/ वारगडे, जव्हार पोलीस ठाणे, तसेच पो.उप.निरी/संदिप नागरे, सफी/रघुनाथ चौधरी, पोना/अवतार, पो.शि/भरत शिंदे, पो.शि/घनश्याम पाटील, नेम, कासा पोलीस ठाणे यांनी उत्कृष्टरित्या पार पाडली आहे.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com