मुंबईतील सोने दागिने विक्री करणारे व्यापारी यांचा विश्वास संपादन करुन सोन्याचे दागिने घेवुन फसवणुक करणारे दोन आरोपी यांचेकडुन गुन्हयामधील एकुण १ करोड १० लाख रूपयाची मालमत्ता हस्तगत…
प्रतिनिधी- महेश वैद्य
मुंबई: लोकमान्य टिळक पोलीस ठाणे, गुन्हे प्रकटीकरण, मुंबई पथकाकडून नमुद आरोपीना अटक करून उल्लेखनीय अशी कामगिरी .

फिर्यादी हे कल्पतरु ज्वेल्स (आय) प्रा. लिमिटेड, नावाने १०९, गणपत भवन, ६८ /७२, पहिली मंझिल, धनजी स्ट्रिट, झव्हेरी बाजार, मुंबई ०३ येथे सोन्याचे दागिने विकण्याचा व्यवसाय करतात. यातील अटक आरोपी दिलीप गौरीशंकर सोनी यांनी फिर्यादी यांचेकडुन २४९८.४२० ग्रॅम वजनाचे, २२ कॅरेट शुध्दतेचे एकुण १,१३,७४,९२९/- रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने फिर्यादी यांचा विश्वास संपादन करुन स्वत:च्या फायदयाकरीता घेवुन गेलेल्या मालाचे पैसे न देता तसेच सोन्याचे दागिनेही परत न करता फसवणुक करण्याच्या इरादयाने सदर मालाचा अपहार करुन फिर्यादी यांची फसवणुक केली म्हणुन दिलेल्या तक्रारीवरुन मा. वरिष्ठांच्या परवागनीने लो. टी. मार्ग पोलीस ठाणे, गु.र.क्र. ११९७ /२१ कलम ४०९, ४२०, ३४ भा. द. वि. अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता.
नमूद गुन्हयाचा कालावधी
गुन्हयातील आरोपी याचा अनेक दिवसापासून शोध चालू होता परंतू सदरचा आरोपी मोबाईल बंद करून परराज्यामध्ये अस्तित्व लपवून राहत होता. सदर गुन्हयाच्या तपासामध्ये गुन्हे प्रकटीकरण शाखा, लो. टि. मार्ग, मुंबई या पथकाने पाहिजे आरोपी शोध घेत असताना गोपनीय माहिती व तांत्रिक तपासामध्ये नमुद आरोपी हा इंदोर, मध्यप्रदेश येथे असल्याची माहीती प्राप्त झाल्याने नमुद आरोपी नामे दिलीप गौरीशंकर सोनी यांस ताब्यात घेवुन त्याचा गुन्हयामध्ये सहभाग निष्पन्न झाल्याने अटक करण्यात आले होते. अटक आरोपी दिलीप गौरीशंकर सोनी यांने केलेल्या निवेदनामध्ये मुंबई येथुन सोने व्यापारी यांचेकडुन घेतलेले काही सोने हे त्याचा भाऊ नामे राजेश गौरीशंकर सोनी यांचे मदतीने त्यांच्या इंदोर, मध्यप्रदेश येथील डिव्हाईन ज्वेलर्स या दुकानामध्ये गलाई केले व गलाई करुन मिळालेले पैसे अटक आरोपी दिलीप गौरीशंकर सोनी याने त्याच्या बॅक खात्यामध्ये जमा केले होते. तसेच काही सोने दुकानामध्ये विकण्यास ठेवले होते. सदर गुन्हयामध्ये राजेश गौरीशंकर सोनी यांचा देखील सहभाग निष्पन्न झाल्याने नमुद गुन्हयामध्ये अटक करण्यात आले.
नमुद गुन्हयामध्ये अटक आरोपी दिलीप गौरीशंकर सोनी यानी केलेल्या निवेदनानुसार ” डिव्हाईन ज्वेलर्स ” गोल्डन प्लाझा, सराफ बाजार, इंदोर, मध्यप्रदेश या दुकानातुन १) पिवळया धातुचे वेगवेगळया आकारचे दागिने एकुण वजन १,५४७ ग्रॅम, रोख रुपये ४,५९,३०० /- रुपये तसेच गुन्हयातील सोने विक्री करून आरोपी दिलीप सोनी यांचे बॅक ऑफ इंडीया खात्यावर ३०, ७४,११७/- असलेली रक्कम अशी एकुण १,१०,३३,४१७ /- रूपयाची मालमत्ता हस्तगत करण्यात आलेली आहे.
नमुद गुन्हयातील आरोपी दिलीप गौरीशंकर सोनी, राजेश गौरीशंकर सोनी हे सध्या मा. न्यायालयाचे आदेशाने न्यायालयीन कोठडीत आहेत. अशाच प्रकारचे अनेक राज्यामध्ये फसवणूक केल्याचे दिसून येत आहे.
श्री. दिलीप सांवत, अप्पर पोलीस आयुक्त (दक्षिण विभाग), मुंबई, श्री. अभिनव कुमार, पोलीस उपआयुक्त, परिमंडल २, मुंबई, श्री. जोत्स्ना रासम, सहायक पोलीस आयुक्त, पायधुनी विभाग, मुंबई
यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमती. ज्योती देसाई यांच्या अधिपत्याखालील स. पो. नि. सुशिलकुमार वंजारी, पो.उ.नि. प्रदिप भिताडे, गुन्हेप्रकटीकरण पथकाचे सफौ. शिंदे, पो.ह. परुळेकर, पो.शि. गुजर, खांडेकर, सातपुते, सांळूखे, साटम, शिंदे यांनी अतिशय सुरेख कामगिरी केलेली आहे.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com