पोलीस असल्याचे सांगुन कारवाई व बदनामी करण्याची धमकी देऊन १० लाख जबरीने नेणाऱ्या आरोपींच्या MHB पोलीसांनी आवळल्या मुसक्या..

प्रतिनिधी-विजय परमार
बोरीवली :- Excellent detection by MHB POLICE STN
Extortion of 10,00,000. ( ten lakh) showing identity card
as fake police officers
CR NO. 503/24
कलम 308,204,351,352,3 (5) भा. न्या. सं 2023 (BNS)
(कलम 384, 170, 506, 504, 34 भादवि)
थोडक्यात हकीकत-
तक्रारदार नामे अंकित प्रियकुमार अग्रवाल वय 42 वर्षे व्य. इस्टेट एजंट रा.ठि.702, क्लासिक बिल्डींग, होली क्रॉस रोड, आय सी कॉलनी बोरीवली पश्चिम मुंबई 400103. मोनं 9819395391 यांनी समक्ष पोलीस ठाणे येवुन सांगितले कि, दिनांक 22/08/2024 रोजी 03:00 वाजण्याचे सुमारास मी माझे ओळखीचे महिला नामे उशा शेटटी हिचे ” एलआयसी कॉलनी, शांती आश्रम बस डेपोच्या समोर बोरीवली पश्चिम मुंबई” या ठिकाणी त्यांची मैत्रिण नामे ज्योती निकम हिला भेटण्यासाठी गेलो असता तेथे वरील वर्णनाचे दोन अनोळखी इसमांनी सदर ठिकाणी येवुन पोलीस असल्याचे सांगुन माझेवर पोलीस कारवाई करण्याची व त्यांची बदनामी करण्याची धमकी देवुन माझे कडुन जबरदस्तीने 10,00,000/- रु. (दहा लाख रुपयें) घेवुन गेले म्हणुन त्यांची वरील वर्णनाच्या दोन इसमाविरुध्द कायदेशिर तक्रार आहे. तक्रारदार यांचा सविस्तर जबाब नोंद करुन गुरक्र 503/2024 कलम 308,204,351,352,3 (5) भा. न्या. सं 2023 (BNS) अन्वये नोंद करण्यात आला आहे.
अटक आरोपितांची नावे-
1) अयुब रेहमान खान, वय – 43 वर्षे, रा.ठी. – बी 205, जयश्री पॅलेस, भाईंदर पुर्व, जि – ठाणे
2) जितेंद्र नारायण पटेल, वय – 56 वर्षे, रा.ठी. – अॅार्नेट गॅलेक्सी, डी/1106, नवकार सिटी, नायगाव पुर्व जि ठाणे
3) सुदर्शन विभीषन खंदारे, वय – 32 वर्षे, राठी – आदर्श इंदिरा नगर, भाईंदर पुर्व जि – ठाणे
तपासी अधिकारी- पोउनि निलेश पाटील यानी केली अशी माहीती सुधीर कुडाळकर वरिष्ठ पोलीस निरीक्षक एम एच बी कॅालनी पोलीस ठाणे, मुंबई यानी दिली.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com