“एटीएम कार्डची अदलाबदली करून नागरीकांची फसवणुक करणा-या टोळीतील दोन आरोपींना पंढरपूर शहर पोलीस ठाणे व खंडणी विरोधी शाखा, पोलीस आयुक्तालय ठाणे शहर यांचे संयुक्त कार्यवाही मध्ये पोलीसांनी घेतले ताब्यात, आरोपीकंडे मिळाली वेगवेगळया बँकाची १०१ एटीएम कार्ड “…

0
Spread the love

उपसंपादक-रणजित मस्के

पंढरपूर: ठाणे शहर, नवी मुंबई, नाशिक, पुणे, सोलापूर परीसरात एटीएम मध्ये जाणा-या नागरीकांना बोलण्यात गुंतवण ठेवुन त्यांचे एटीएम कार्डची अदलाबदली करून नागरीकांची फसवणुक करून रक्कम काढुन नेण्याबाबतचे तकारींचे प्रमाण वाढले होते त्या अनुषंगाने खंडणी विरोधी शाखा, पोलीस आयुक्तालय ठाणे शहर व सोलापूर ग्रामीण पोलीस दलातील पंढरपूर शहर पोलीस ठाणे यांना सदरचे फसवणुकीचे गुन्हयांबाबत प्रतिबंधात्मक उपाययोजना व दाखल गुन्हयांचा कौशल्यपूर्ण तपास करणेबाबत वेळोवेळी वरीष्ठांकडून सुचना व मार्गदर्शन मिळाले होते.

पोलीस आयुक्तालय ठाणे शहर व सोलापूर ग्रामीण पोलीस ठाण्याचे हद्दीमध्ये घडलेल्या गुन्हयांचा तपशिल संकलीत करून घटनास्थळांवरील कौशल्यपूर्ण तांत्रिक तपास करून अशा प्रकारचे गुन्हे करणान्या गुन्हेगारांची माहिती प्राप्त करून एटीएम कार्ड बदली करून फसवणुक करणा-या सराईत गुन्हेगार यांचा कसोशीने मार्ग काढत असताना ठाणे शहर पोलीस आयुक्तालयातील खंडणी विरोधी शाखा यांना पाहीजे असलेले आरोपी १) सनी उर्फ विकण्या मुन्ना सिंग वय २७ रा. नेहरूनगर, विठ्ठलवाडी, कल्याण पुर्व, जि.ठाणे मुळ जि. कानपूर, उत्तरप्रदेश २) श्रीकांत प्रकाश गोडबोले वय २८ वर्ष, रा. भैयासाहेब आंबेडकर नगर, खेमाणी उल्हासनगर २, जि ठाणे हे दि ०९/०१/२०२३ रोजी पंढरपूर शहर पोलीस ठाणे हद्दीत आहेत. अशी माहीती पोलीस उपनिरीक्षक महेश कावळे, नेमणुक खंडणी विरोधी शाखा, पोलीस आयुक्तालय ठाणे शहर यांना मिळाल्यावर त्यांनी तात्काळ पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात संपर्क साधला असता सदरचे आरोपीबाबत माहीती कळविली. त्यानुसार पंढरपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीसांनी तात्काळ दोन पथके तयार करून आरोपींचा कसोशीने शोध घेण्यास सुरवात केली. तांत्रिक विश्लेषनाच्या आधारे सिनेस्टाईल प्रमाणे वरील आरोपी १) सनी उर्फ विकण्या मुन्ना सिंग वय २७ रा. नेहरूनगर, विठ्ठलवाडी, कल्याण पुर्व, जि.ठाणे मुळ जि. कानपूर, उत्तरप्रदेश २) श्रीकांत प्रकाश गोडबोले वय २८ वर्ष, रा. भैयासाहेब आंबेडकर नगर, खेमाणी उल्हासनगर २, जि ठाणे यांना पंढरपूर शहर पोलीसांनी ताब्यात घेतले असता त्यांचेकडे वेगवेगळ्या बँकांचे एकुण १०१ एटीएम कार्ड मिळाले आहेत. चौकशी केली असता त्यांनी या पुर्वी ठाणे शहर, नवी मुंबई, पुणे, नाशिक, पंढरपूर या हद्दीत गुन्हे केल्याची कबुली आरोपींनी दिली आहे. सदरचे आरोपींना पंढरपूर शहर पोलीसांनी ताब्यात घेतले असुन पुढील कार्यवाही करीता खंडणी विरोधी शाखा, ठाणे शहर पोलीस आयुक्तालय यांचेकडे हस्तांतरीत करण्याची प्रकीया चालू आहे.

सदरची कार्यवाही मा. शिरीष सरदेशपांडे पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण, मा हिंमत जाधव अपर पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण, मा विक्रम कदम, उपविभागीय पोलीस अधिकारी पंढरपूर, मा अरूण फुगे वरीष्ठ पोलीस निरीक्षक पंढरपूर शहर पोलीस ठाणे यांचे मार्गदर्शनाखाली पंढरपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक प्रशांत भागवत, पोना / २२१ प्रसाद औटी, पोना / १६५ समाधान पाटील, पोशि/ २१८७ माधव वडडेटीवार, पोशि/ १९०४ निलेश कांबळे, चालक पोशि/ १०४३ रामकिसन खेडकर सायबर पोलीस ठाण्याचे पोशि/ अन्दर आत्तार तसेच खंडणी विरोधी शाखा, ठाणे शहर यांचेकडील पोलीस उपनिरीक्षक महेश कावळे यांनी पार पाडली असुन पुढील तपास खंडणी विरोधी शाखा, पोलीस आयुक्तालय ठाणे शहर हे करीत आहेत.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः

मोबा.नं. 9920601001

info@surakshapolicetimes.com

diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट