भिगवण पोलीसांनी लिफ्टचा बहाणा करून जबरी चोरी करणारे चोरटे केले जेरबंद !

उपसंपादक उमेद सुतार
पुणे :
भिगवण गावचे हददीत सागर हॉटेल समोर सोलापुर पुणे रोडवर फिर्यादी नामे सौ. लीलाबाई पोपट मोघे, रा. जागेराव, ता. दौंड, जि. पुणे हया व त्याची ननंद शकुंतला किसन फासगे हया रावणगाव येथे जाण्यासाठी थांबलेल्या असताना एका पांढऱ्या रंगाच्या चारचाकी गाडी मधुन एक पुरुष व दोन महीला यांनी त्यांना लिफ्ट देणेचा बहाण करून त्यांना गाडीमध्ये बसवुन फिर्यादी यांचे गाळयातील दीड तोळे वजनाचे सोन्याचे मंगळसुत्र अंदाजे किंमत रूपये ५४,०००/- रु चे जबरीने काढुन घेवुन त्यांना गाडीतुन खाली उतरून जबरीने चोरी केली.
फिर्यादीवरून भिगवण पोलीस स्टेशन, गुन्हा. रजि. नंबर. ४१६/२०२४, भारतीय न्याय संहीता सन. २०२३ चे कलम. २००९ (४), ३ (५) प्रमाणे गुन्हा दाखल आहे. सदरचा गुन्हा हा गंभीर स्वरूपाचा असल्याने भितीचे वातावरण निर्माण झाल्याने भिगवण पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सहा. पोलीस निरीक्षक विनोद महांगडे यांनी गुन्हयाचे तपासी अंमलदार प्रविण जर्दै, पोलीस उपनिरीक्षक यांना मार्गदर्शन करून गुन्हयाचा सखोल तपास करणेबाबत आदेशीत केले आहे.त्याप्रमाणे गुन्हयाचा सखोल तपास चालु असताना अशाच प्रकारचा इंदापुर पोलीस स्टेशनचे हददीत गुन्हा घडलेला असल्यामुळे इंदापुर पोलीस स्टेशनचे गुन्हयातील आरोपी नामे १) संभाजी शिवाजी भोसले, २) महानंदा भद्री पवार उर्फ महानंदा लीला पवार, ३) ममता संभाजी भोसले, सर्व रा. बिसमिल्लानगर, मुळेगाव रोड, उत्तर सोलापुर यांना सदर गुन्हयात वर्ग करून घेवुन त्यांचेकडे दाखल गुन्हयाचा सखोल तपास केला असता आरोपी यांनी सदरचा गुन्हा केल्याची कबुली देवुन सदर गुन्हयातील चोरीस गेलेले सोन्याचे मंगळसुत्र अंदाजे किंमत रूपये ५४,०००/- रु काटुन दिले आहे. ते गुन्हयाचे पुराव्याकामी जप्त करण्यात आले आहे.
सदर गुन्हयाचा पुढील तपास प्रविण जर्दै, पोलीस उपनिरीक्षक हे करीत आहेत. सदरची कामगिरी मा. पंकज देखमुख साो, पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण, मा. गणेश बिरादार साो, अपर पोलीस अधीक्षक, बारामती विभाग, पुणे ग्रामीण, मा.डॉ. सुदर्शन राठोड साो, उपविभागीय पोलीस अधीकारी, बारामती विभाग, यांचे मार्गदर्शनाखाली विनोद महांगडे, सहा. पोलीस निरीक्षक, भिगवण पो. स्टे, भिगवण पो. स्टेचे पोलीस उपनिरीक्षक प्रविण जर्दै, पोलीस अंमलदार रामदास कर्चे, दिपाली खेत्रे यांनी केली आहे.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com