क्रिप्टो ट्रेडिंग मध्ये गुंतवणूक करून अर्ध्या तासात पैसे डबल करून देतो म्हणुन ऑनलाईन फसवणूक करणारा मुख्य सुत्रधारास सुरत येथुन शिताफिने जेरबंद…

उपसंपादक-रणजित मस्के
छत्रपती संभाजीनगर: – छत्रपती संभाजीनगर ग्रामीण सायबर पोलीसांची अति उल्लेखनीय कारवाई..
दिनांक 06/8/2022 रोजी कन्नड येथील तक्रारदार यांनी पोलीस ठाणे सायबर, छत्रपती संभाजीनगर ग्रामीण येथे तक्रार दिली कि, त्यांचे मुलास अज्ञात इन्स्टाग्राम खात्याचा वापरकर्ता याने क्रिप्टो ट्रेडिंग करून अर्धा तासात पैसे डबल करून देतो अशी थाप मारून 71,080/- रूपयांचा भरणा करून घेवुन फसवणूक केली आहे. यावरुन पोलीस ठाणे सायबर ग्रामीण येथे गुरंन 37/2022 कलम 420 भादंवी सह कलम 66(ड) आयटी ऍ़क्ट अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
मा. मनिष कलवानिया, पोलीस अधीक्षक यांचे मार्गदर्शनानुसार ऑनलाईन फसवणुकीचा गुन्हयांचा अत्यंत बारकाईने व तांत्रिक विश्लेषणांचे आधारे सायबर पोलीसांनी तपास करून या गुन्हयात गुजरात राज्यातील भामटयांचा सहभाग असल्याचे निष्पन्न करून यापुर्वी दिनांक 18/10/2022 रोजी सुरत येथून तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपी नामे सय्यद महंमद उनेस मियॉ हाफीज वय 30 वर्षे धंदा (जुने मोबाईल खरेदी विक्री करणे ) रा. नानपुरा मार्केट,सुरत गुजरात राज्य, यास ताब्यात घेवुन त्याची कसोशीने चौकशी केली असता त्याने सांगितले कि, त्याने त्याच्या साथीदाराचे सांगणे वरून क्रिप्टो ट्रेडिंग नावाचे इन्सटाग्राम खाते तयार केले त्या खात्यावर वेगवेगळया राज्यातुन लोकांना अर्धा तासात पैसे डबल करून देण्याचे आमिष दाखवुन पैशाचा भरणा करून घेत होतो. यावरून ग्रामीण सायबर पथकांने त्याला अटक केली होती. परंतु यातील मुख्य सुत्रधार हा गुन्हा घडल्यापासुन फरार होता.
मा. पोलीस अधीक्षक यांनी नमुद गुन्हयांचा आढावा घेतला असता यातील मुख्य सुत्रधार हा मागील एक वर्षापासुन पोलीसांना गुंगारा देत असल्याचे निदर्शनास आल्याने मा.पोलीस अधीक्षक यांचे मार्गदर्शनानुसार सायबर पोलीसांचे एक पथक तयार करून त्यांना सुरत येथे पाठविण्यात आले होते. पथकांने रात्र-दिवस आरोपीचा ठाव ठिकांचा शोध घेवुने गोपनीय बातमीदार नेमुण तसेच तांत्रिक विश्लेषणाचे आधारे मुख्य आरोपीचा ठिकाण कसोशीने शोधण्यास सुरूवात केली यावेळी त्यांना गोपनीय बातमीदारा मार्फेत माहिती मिळाली कि, यातील संशयीत हा सुरत शहरातील जनता मार्केट येथे येणार आहे यावरून पथकांने तात्काळ जनता मार्केट येथे सापळा लावला. यावेळी संशयीत ईसम हा पोलीसांना येतांना दिसताच पथकांने त्यांचे दिशेने धाव घेताच त्याने पोलीसांची हालचाल बघुन मार्केट मधील गर्दीचा फायदा घेवुन जोरात धुम ठोकली. परंतु पोलीसांनी त्यांचा कसोशिने पाठलाग करून काही अंतरावर त्याच्या मुसक्या आवळल्या.
यावेळी त्यास विश्वासात घेवुन त्याचे नाव गाव विचारता त्यांने त्याचे नाव अबुबकर मोहमंद शबीर नवाब वय 38 वर्षे धंदा जुने मोबाईल खरेदी विक्री करणे, रा. मिरा अपार्टमेंट शिंदवाडा, नानपुरा, सुरत असे सांगुन नमुद गुन्हा हा त्याने त्याचे साथीदारचे मदतीने केला असल्याचे कबुली दिली आहे.
नमुद गुन्हयात त्यास अटक करण्यात आली असुन मा. न्यायालयाने त्यास 03 दिवसांची पोलीस कस्टडी रिमांड दिला असुन यावेळी त्याने लोकांची फसवणूक करण्यासाठी त्यांने क्रिप्टो ट्रेडिंग नावाचे इन्सटाग्राम 05 खाते तयार केले असुन त्याने या खात्यांना 1) शिव ट्रडेर्स 2) ट्रेड इन क्रिप्टो 3) रॉयल इन्व्हेस्टमेंट 4) क्रिप्टो ऑन इंडिया 5) बिट कॉईन इन्व्हेस्टमेंट असे नावे देण्यात आली आहेत. यापासुन नागरिकांनी दुर रहावे.
मा. पोलीस अधीक्षक यांनी नागरिकांना आवाहन केले आहे कि, त्यांनी इन्सटाग्राम वरिल पैसे दुप्पट करून देणा-या वरिल कोणत्याही खात्यांना सक्रिय करू नयेत तसेच त्यांना प्रतिसाद देवु नये जेणे करून त्यांची फसवणूक होणार नाही. वरिल खात्यांचा वापर करणे कटाक्षाने टाळावे.
नमुद कारवाई मा. मनिष कलवानिया, पोलीस अधीक्षक, मा. सुनिल कृष्णा लांजेवार, अपर पोलीस अधीक्षक यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री संजय सहाणे, पो.उप.नि. श्री. सतिष भोसले, पोलीस अंमलदार कैलास कामठे, मुकेश वाघ, दगडु जाधव, दिलीप पवार, योगेश तरमाळे, जिवन घोलप यांनी केली आहे.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com