जबरीने मारहाण करुन रोख रक्कम, सोने, गाडी, मोबाईल लुटणारी अट्टल टोळी शिताफीने जेरबंद उंब्रज पोलीस टिमची प्रशंसनीय कामगिरी

0
Spread the love

उपसंपादक – रणजित मस्के

सातारा :- दिनांक ०९/०९/२०२३ रोजी रात्री ०१.३० वा. मौजे शामगांव ता. कराड गावचे हदीत शामगांव घाटात एक महिंद्रा बोलोरे पिकअप, सोन्याची चीन, रोख रक्कम, आप फोन कंपनीचा मोबाईल असा एकूण ७,१७,५००/- किंमतीचा मुद्देमाल ४ अनोळखी इसमांनी फिर्यादी नामे अमिन दाऊल वडगांवकर रा. समतानगर, मिरज जि. सांगली यांना गाडी आडवी मारुन त्यांना जबरदस्तीने खाली ओढून पोलो गाडीत बसवून एका शेतात नवून त्या ठिकाणी हाताने व लाथाबुक्यांनी मारहाण करुन जबरदस्तीने चोरुन नेहली म्हणून उंब्रज पोलीस स्टेशन गु. र. नं. ५४८ / २०२३ भादंवि कलम ३९२, ३९४, ५०४, ५०६, ३४ प्रमाणे दाखल करणेत आलेवर सहा. पोलीस निरीक्षक प्रशांत बधे यांनी पोलीस टीम तयार करून पसार झालेले अज्ञात आरोपीचा शोध घेणे कामी योग्य सूचना देवून मार्गदर्शन केलेन पोलीस उपनिरीक्षक महेश पाटील, पो. हवा. संजय धुमाळ, पो. कॉ. मयुर थोरात, पो. कॉ. राजकुमार कोळी, पो. कॉ. गणेश कुंदे यांनी सदर गुन्हा करून पसार झालेले आरोपी नामे बबलु रमेश सूर्यवंशी, यश अजित कांबळे, महेश रामचंद्र आवळे तिघे रा. हातकणंगले जि. कोल्हापूर यांना इचलकरंली जि. सांगली येथून व अरोपी नामे अनुश चिताणी पाटील, वैभव रविंद्र पावस्कर दोघे रा. सातारा यांना सातारा येथून शिताफिन दिनांक २४/०९/२०२३ रोजी ताब्यात घेतले आहे. सदर पाच आरोपी यांचेकडे विचारपुस करून त्यांचेकडून ६,००,०००/- रुपये किमीची एक चार चाकी गाडी, ३०,०००/- रुपये किमतीचा मोबाईल तसेच आरोपीनी गुन्हा करतेवेळी वापरलेली एक पोलो गाडी अशा मुद्देमाल हस्तगत करणेत आलेला आहे. तसेच यात अज्ञात आणखी काही संशयीत आरोपीचा शोध घेण्याचे काम चालू आहे. सदर गुन्ह्याचे तपासामध्ये योग्य ते कलम वाढ करणेत आलेली आहे.

अशा प्रकारे उंब्रज गुन्हे प्रकटीकरण शाखेने जबरीने मारहाण करून रोख रक्कम, सोने, गाडी, मोबाईल लुटणारी अट्टल टोळी गोपनीय व तांत्रिक माहितीचे अधारे जेरबंद करणेत आले आहे.

सदरची कारवाई मा. पोलीस अधिक्षक सो, सातारा श्री. समीर शेख साहेब, मा. अप्पर पोलीस अधिक्षक गो श्री. बापू बांगर साहेब, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी सो, श्री. अमोल ठाकुर साहेब यांचे मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक प्रशांत बधे, पोलीस उपनिरीक्षक, महेश पाटील, पो. हवा, संजय धुमाळ, पो. कॉ. मयुर धोरात, पो. कॉ. राजकुमार कोळी, पो. कॉ. गणेश कुंदे, सायबर शाखेचे पोलीस अंमलदार यांनी केली आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उनिरीक्षक महेश पाटील हे करीत आहेत.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट