पुण्यात आरंभ सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून महिलांना व्यवसाय मार्गदर्शन…

0
Spread the love

उपसंपादक-रणजित मस्के

पुणे:– दिनांक 17 मार्च 2024 रोजी पुणे येथे यशश्री शिक्षण संस्था संचलित प्रिन्स्टन इंटरनॅशनल स्कूल संतोष नगर कात्रज पुणे येथे संस्थापिका जयश्री घाटगे मॅडम खजिनदार श्री अथर्व घाटगे सर आणि मुख्याध्यापिका सौ स्वाती काळे मॅडम यांच्या सहकार्याने आरंभ सोशल फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्ष सौ सुवर्णाताई कदम यांच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणासाठी महिलांसाठी मोफत वेगवेगळे कोर्सेस बद्दल माहिती देण्यात आली .

तसेच बचत गटाबद्दल माहिती देण्यात आली महिलांना कोर्सेस कम्प्लीट झाल्यानंतर जॉब देणे तसेच व्यवसायाची माहिती मिळवून देणे तसेच व्यवसायासाठी आर्थिक स्तोत्र उपलब्ध करून देणे शासकीय सबसिडीच्या माध्यमातून लोन उपलब्ध करून देणे तसेच व्यवसाय मार्गदर्शन करून व्यवसाय उभा होईपर्यंत संपूर्ण पाठपुरावा करणे याबद्दल सर्व माहिती देऊन सहकार्य करण्याच्या आश्वासन दिले या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून युनिव्हर्सल हुमान राइट्स कौन्सिल भारतच्या सौ शोभना पोटे व श्री प्रकाश पोटे यांची उपस्थिती लाभली.

त्याबद्दल त्यांचे मनापासून धन्यवाद संस्थापिका जयश्री घाटगे मॅडम आणि मुख्याध्यापिका सौ स्वाती काळे मॅडम यांच्या पुढाकाराने आणि प्रयत्नाने विविध कोर्सेस लवकरच सुरू होत आहेत त्यामुळे कात्रज भागात भागातील सर्व महिलांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून त्यांच्या आशा पालावलेल्या आहेत सर्व महिलांना सर्वांच्या सहकार्याने एक नवीन दिशा मिळणार आहे आणि या सर्व महिला नक्कीच त्यांच्या संसाराला हातभार लागणार आहे त्यामुळे सर्व वर्गातून संस्थापिका घाटके मॅडम आणि सौ स्वाती मॅडम यांचा कौतुक होत आहे.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट