३ वर्षाच्या अपहरण झालेल्या बालकास सुखरुपपणे ताब्यात घेण्यात बंडगार्डन पोलीसांना मोठे यश ..

0
Spread the love

उपसंपादक-रणजित मस्के

पुणे :-फिर्यादी नामे दिलीप उमेशसिंग चव्हाण वय २२ वर्षे राह. अवताडे वस्ती रेल्वे दवाखाना पाठीमागे, कुर्डवाडी मुळगाव-पोकर्णी तालुका- टिबंणी जिल्हा- हाडदा राज्य- मध्यप्रदेश यांनी दि ०६/०३/२०२४ रोजी समक्ष पोलीस ठाणेस हजर राहुन फिर्याद दिली की त्यांचा मुलगा नामे अर्जुन दिलीप चव्हाण वय ३ वर्षे राह. सदर यास दिनांक ०५/०३/२०२४ रोजी रात्री २२.०० वाजताच्या सुमारास पुणे रेल्वे स्टेशन आरक्षण केंद्र समोरून कोणीतरी अज्ञात आरोपीने अपहरण केल्याचे सांगितल्याने बंडगार्डन पोलीस ठाणे गु.र.नं. ६८/२०२४ भादंवि कलम ३६३ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सदर गुन्हयाचे तपासाच्या अनुषंगाने पुणे रेल्वे स्टेशन परीसरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली असता एक अज्ञात इसम वय अंदाजे २३ ते २५ वर्षे यान अपहरण झालेल्या बालकांस पुणे रेल्वे स्टेशन प्लॉट फॉर्म नंबर ३ वर आलेल्या पुणे लखनी एक्सप्रेस ११४०७ या ट्रेनमध्ये बालकांसह बसुन गेल्याचे निष्पन्न झाल्याने बंडगार्डन पोलीस ठाणे गुन्हेप्रकटीकरण पथकाचे सपोनि संदीप मधाले व पोउपनि रविंद्र गावडे व टीम यांनी सदर एक्सप्रेसच्या मार्गावरील दौडं, अहमदनगर, मनमाड, भुसावळ, जळगाव या रेल्वे स्टेशनवरील सीसीटीव्ही कॅमेरॉची पाहणी करून आरोपी व बालकाचा शोध घेतला असता सदरचा आरोपी हा बालकासह भुसावळ रेल्वे स्टेशन येथे उतरुन तेथुन मुंबई सेंट्रल स्पेशल ट्रेनमध्ये बसून सुरत मागें मुंबई सेंट्रल रेल्वे स्टेशन येथे गेल्याचे निष्पन्न केले. सदरचा गुन्हा घडल्यापासुन सतत बारकाईने पूर्ण कालावधीचे २०० पेक्षा जास्त सीसीटीव्ही कॅमेरे पाहुन काही सेकंदाच्या वेळेवर कॅमेरासमोरुन जाणा-या अपहत बालक व संशयीत आरोपी यांची माहिती प्राप्त करुन मुंबई सेंट्रल रेल्वे पोलीसांना माहिती देवून बालकास सुखरुप पणे ताब्यात घेतले आहे.

सदरची कारवाई ही मा प्रविणकुमार पाटील सो।, अप्पर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग पुणे, मा श्रीमती स्मार्तना पाटील मॅडम, पोलीस उपआयुक्त परिमंडळ २. मा संजय सुर्वे सोो, सहाय्यक पोलीस आयुक्त लष्कर विभाग, मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदिपान पवार, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्रीकांत निबालकर यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि संदीप मधाले, गुन्हे शोध पथकाचे पो.उप-निरीक्षक रविंद्र गावडे, सुधीर घोटकुले, ज्ञानेश्वर बडे, ज्ञानेश्वर गायकवाड, मनोज भोकरे, शिवाजी सरक यांचे पथकाने केली.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट