बिल्डिंगच्या ड्रेनेज पाईपद्वारे वर चढून घरफोडी करणाऱ्या स्पायडरमॅन आरोपीतास एम.एच.बी.काॅलनी पोलीसानी ठोकल्या बेड्या. ..

0
Spread the love

उपसंपादक-रणजित मस्के

बोरीवली :

CR no 276/2023, Us 457,380 IPC

सदर गुन्हयाची थोडक्यात हकीकत अशी की, दिनांक 22/06/2023 रोजी फिर्यादी श्रीमती श्वेता टेकचंद वीरा वय 32 रा.ठि- 201,अर्पिता अपार्टमेंट, राजाराम तावडे रोड,म्हात्रे वाडी, दहिसर पश्चिम, मुंबई हे रात्रौ झोपलेले असताना 02.00 वा.दरम्यान त्यांना अचानक जाग येवून पाहिले असता त्यांना त्यांच्या घरात कपाटाजवळ एक इसम चोरी करताना दिसून आला. त्यावेळी त्यांनी घरातील लाईट लावली असता चोरी करणाऱ्या इसमाने भीतीने घाई बडबडीने फिर्यादीच्या स्वयंपाकाच्या घराच्या खिडकी मधून खाली उडी मारली व तेथून पळून गेला. त्यावेळी फिर्यादी यांनी त्यांच्या कपाटातील सामानाची तपासणी केली असता त्यामधून खालील नमूद सामान चोरीला गेल्याचे आढळून आले.

1) सोन्याचे कानातले एक जोड वजन अंदाजे 2 ग्राम किंमत 10,000/-
2) रोख रक्कम सहा हजार रुपये असे
एकूण 16 हजार रुपये किमतीचे सामान चोरी झाल्याबाबत तक्रार दिल्यावरून वर नमुद प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला.

सदर गुन्ह्याच्या तपासामध्ये गुन्हे प्रकटीकरण अधिकारी सपोनि सुर्यकांत पवार,पोउनि अखिलेश बोंबे व पथक यांनी नमूद गुन्ह्याच्या घटनास्थळाची पाहणी केली असता फिर्यादी यांचे इमारतीच्या स्वयंपाकाच्या खिडकीच्या खाली दोन दात तुटलेले मिळून आले. तसेच समोरच्या भिंतीवर देखील रक्त लागल्याचे दिसून आले.

नमुद इमारतीचे सी.सी.टी.व्ही पाहिले असता वय वर्ष 25 ते 30 वयोगटातील एक इसम हा इमारतीच्या ड्रेनेज पाईपावरून दुस-या मजल्यावर चढलेला व त्यानंतर पाईपवरून खाली येत असताना तोल जावून पडल्याचे व त्यानंतर सरपटत सरपटत पळून गेल्याचे दिसून आले.

त्यावरून इमारतीच्या आसपासचे सीसीटीव्ही फुटेज पाहिले असता कोठेही उपयुक्त माहिती मिळून आली नाही.

त्यानंतर नमुद आरोपीत इसमास झालेल्या जखमेच्या अनुषंगाने गुन्हे प्रकटीकरण पथकातील पो. शि 140340/योगेश मोरे व पो.शि 111518/सवळी यांनी दहिसर ते चर्चगेट व दहिसर ते विरार असे जवळ जवळ 700 ते 800 हॉस्पिटलची पाहणी केली असता आरोपीत इसम हा रामकिशन हॉस्पिटल,सांताक्रुज पश्चिम,मुंबई या ठिकाणी औषधउपचार घेत असल्याचे दिसून आला.

त्यावेळी माननीय वरिष्ठांचे सल्लामसलतीने आरोपीतावर दररोज पाळत ठेवलेली होती. ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीस आरोपीत इसमास डिस्चार्ज मिळाल्याने व त्याची प्रकृती ही सुव्यवस्थेत असल्याची खात्री झाल्यावरुन दिनांक 17/10/2023 रोजी जिवदानी चाळ,मिनी नगर चौगुले खदान,दहिसर पूर्व,मुंबई या ठिकाणावरून अटक करण्यात आले.

सदर गुन्ह्यातील मालमत्ता हस्तगत करण्यात आलेली आहे

अटक आरोपी नाव व पत्ता :- रोहित रमेश राठोड वय 29 वर्ष व्यवसाय -नाही, राहण्याची ठिकाण :- चौगुले खदान, जीवदानी चाळ, कोकणीपणा, दहिसर पूर्व,मुंबई

गुन्हे अभिलेख:-

वाकोला पोलीस ठाणे
1) 133/2018, Us 380,34 IPC
2) 279/2011, Us 170,420, 34 IPC
3) 408/2015,Us 454,380 IPC
4) 567/2015, Us 324,506, 504 IPC
5) 517/2019,Us
6) 55/2015, कलम 8 क 27 एन डी पी एस

वनराई पोलीस ठाणे
7) 253/2018, कलम 401 भादविसह 122 मपोका

गावदेवी पोलीस ठाणे
8) 7/2018, कलम 124 मपोका
डी.बी. मार्ग पोलीस ठाणे
9)106/2018, कलम 380 IPC
10) 111/2018, Us 379 IPC

अंधेरी रेल्वे पोलीस ठाणे
11) 7/2016,Us 392,356,34 IPC

काळाचौकी पोलीस ठाणे
12) 197/2017,कलम 379 भादवी

खार पोलीस ठाणे
13) 278/20 17, कलम 457 380 भादवी
14) 413/2017, Us 380 427 भादवी

कांदिवली पोलीस ठाणे
15) 450/2017, कलम 457,380सह142 मपोका
16) 456/2017, कलम 457,380,34 IPC
17) 143/2018, कलम 457 380 IPC

निर्मल नगर पोलीस ठाणे
18) 115/2018, कलम 380,34

वाकोला पोलीस ठाणे
19) 137/2018, कलम 380 भादवी

नमुुद अटक आरोपीत इसमास हद्दपार आदेश क्रमांक 70/सी/43/ परी 8 /2019, दिनांक 21/12/20121 अन्वये 2 वर्षाकरिता कलम 55 मपोका नुसार मा.पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-8, मुंबई यांचे कार्यालयाकडून मुंबई, ठाणे जिल्हयातून हद्दपार करण्यात आलेले आहे.

उघडकीस आलेले गुन्हे :-
एम एस बी कॉलनी पोलीस ठाणे 1016/2022, कलम 457,380 IPC

तपास पथक:-
पो.नि (गुन्हे) सचिन शिंदे
सपेनि सूर्यकांत पवार
पोउनि अखिलेश बोंबे
पो. ह 961391/ अनिल शिंदे
पो.ह 980725/श्रीधर खोत
पो.शि 111518/ सवळी
पो.शि १४०३४०/ योगेश मोरे यांनी केली अशी माहिती श्री .
सुधीर कुडाळकर,
वरिष्ठ पोलीस निरीक्षक,
एम.एच.बी कॉलनी पोलीस ठाणे,मुंबई यांनी दिली.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट