बौद्धजन पंचायत समिती सभापती आनंदराज आंबेडकर यांच्या हस्ते जेष्ठ समाजसेवक सदानंद येलवे यांना समाज भूषण पुरस्कार प्रदान…

0
Spread the love

प्रतिनिधी :-सचिन पवार
माणगांव रायगड

माणगांव :=बौद्धजन पंचायत समितीच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रणित 98 वा चवदार तळे सत्याग्रह निमित्त माजी गटप्रतिनिधी सदानंद येलवे जेष्ठ समाजसेवक तसेच सोनबा येलवे यांचे नातू त्यांच्या 81 व्या वाढदिवसानिमित्त 20 मार्च चवदार तळे सत्याग्रह दिनी महाड क्रांतिस्तंभ या ठिकाणी आनंदराज आंबेडकर यांच्या हस्ते समाजभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला.

यावेळी बौद्धजन पंचायत समिती या विचारमंच्यावर कार्याध्यक्ष लक्ष्मण भगत, उप सभापती विनोद मोरे, उप कार्याध्यक्ष चंद्रमणी तांबे,अतिरिक्त सरचिटणीस विठ्ठल जाधव, रवींद्र पवार, राजेश घाडगे, जीवन गौरव कमिटी चिटणीस रुपेश गमरे, रायगड जिल्हा प्रतिनिधी भूपेंद्र सवादकर, महाड तालुका अध्यक्ष अशोक जाधव, सरचिटणीस सखाराम जाधव तसेच तालुका शाखा व उपशाखा यांचे पदाधिकारी उपस्थित होते.आनंदराज आंबेडकर यांनी सदानंद येलवे यांच्या बाबत गौरव उदगार काढताना सांगितले की आंबेडकर चळवळीतील सामाजिक कार्यकर्ते सदानंद येलवे हे रायगड जिल्ह्यातील जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते असल्यामुळे त्यांना समाजभूषण पुरस्कार देण्यात येऊन सन्मान करण्यात आला यावेळी बौद्धजन पंचायत समितीचे मान्यवर पदाधिकारी व असंख्य भिम अनुयायी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट