पालघर तालुक्यामधील सफाळे येथील शिलटे या गावी तलावाचे खोदकाम करताना सापडली बुद्ध मूर्ती

पालघर संघर्ष: शनिवार 25 मे 2024
(प्रतिनिधी) : मंगेश उईके
पालघर :- पालघर जिल्ह्यातील सफाळे रेल्वे स्टेशन पासून पश्चिमेस 4 की.मी. अंतर असलेल्या शिलटे या गावी वर्षभरापूर्वी जेसीबीच्या सहाय्याने तलावाचे खोदकाम सुरू असताना, काही पुरातन अवशेष व मूर्ती बाहेर आल्याने जेसीबी वाल्याने काम थांबवून तेथून पळायान केले. परंतु सदरची बातमी शिलटे ग्रामपंचायतीचे विद्यमान ग्रामसेवक यांनी पुरातन विभागाला कळवणे आवश्यक असताना जाणिवपूर्वक त्याकडे दुर्लक्ष केले.
भारतीय बौद्ध महासभेचे बौद्धाचार्य व बौद्ध धम्माचे प्रचारक आदरणीय श्रीपाद शेलार गुरूजी यांना सदरची माहिती मिळाली असता, स्वतः श्रीपाद शेलार गुरुजी, काळे गुरुजी, दत्ताराम गायकवाड गुरुजी व प्रदीप जाधव गुरुजी यांनी घटनास्थळी भेट देऊन खातरजमा केली. व स्वतः तळ्यात उतरून घाणीत पडलेले अवशेष पाण्याने स्वच्छ धुऊन पाहणी केली असता तथागत बुद्धांची मूर्ती व अवशेष असल्याचे स्पष्ट झाले.
दरम्यान श्रीपाद शेलार गुरूजी यांनी सामाजिक कार्यकर्ते आविश राऊत यांना शनिवार दिनांक 25 मे रोजी रात्री 8.00 वाजताच्या सुमारास भ्रमणध्वनी द्वारे कळवले असता, तसेच संपूर्ण माहिती त्यांच्या पर्सनल वॉट्स ॲप वर पाठवली असता, आविश राऊत यांनी वेळ न दडवता त्याच वेळेस सदरची माहिती उपजिल्हाधिकारी साहेब पालघर (RD) सुभाष भगाडे साहेब , पालघरचे तहसीलदार रमेश शेडगे साहेब आणि पालघर गटविकास अधिकारी नरेंद्र रेवंडकर साहेब यांना प्रत्यक्ष भ्रमणध्वनी द्वारे माहिती देण्यात आली आहे. तसेच या ऐतिहासिक ठिकाणी ताबडतोब संरक्षण देण्याबाबत तसेच पुरातन विभागास प्राचारण करण्याबाबत विनंती करण्यात आली आहे.






तसेच याबाबतची माहिती पालघर जिल्हाधिकारी गोविंद बोडके साहेब यांनाही भ्रमणध्वनी द्वारे सकाळच्या सुमारास आविश राऊत यांनी कळविले असता, त्वरित कार्यवाही बाबत आश्वासन जिल्हाधिकारी साहेब यांना राऊत यांनी दिले आहे. सदरच्या ऐतिहासिक वारसा असलेल्या ठिकाणी पुरातन विभागाला पाचारण करण्यात येऊन संरक्षण देण्यात यावे याबाबत कार्यवाही करण्याची विनंती संबंधित अधिकाऱ्यांना करण्यात आली आहे.
तसेच शिलटे गावाचे ग्रामसेविका प्रतीक्षा पाटील यांना त्वरित प्रत्यक्ष ठिकाणी जाऊन स्थळ पाहणी करून अहवाल सादर करण्याचे आदेश गटविकास अधिकारी पालघर यांनी दिले आहेत.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com