ब्रुनेई देशात वेल्डर, ड्रायव्हर, प्लंबर वर्क ऑर्डर तसेच बनावट व्हिसा देवुन फसवणाऱ्या टोळीला हिंजवडी पोलीसांनी ठोकल्या बेड्या..

0
Spread the love

उपसंपादक-रणजित मस्के

पुणे :- दि. २७/१२/२०२३ रोजी हिंजवडी पोलीसांना, मुमकर चौक, वाकड भागात बनावट व्हीसा बनवुन, परदेशात नोकरी लावुन देऊ असे सांगुन नागरीकांची फसवणुक करणारे कार्यालय असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार तक्रारदार नामे मनिष कन्हैय्यालाल स्वामी, वय ३२, रा. गड च्या मागे, राज का बारा, विश्वकर्मा भवन जवळ, चुरू, जि. चुरू, राज्य राजस्थान यांनी तक्रार दिल्याने हिंजवडी पोलीस ठाणे, गु.र.नं. ८९/२०२४ भादवि कलम ४२०,४६५,४६८,४६९, ४७०,४७६,३४ प्रमाणे दाखल केली.

त्यानंतर श्रीराम पौळ वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांचे मार्गदर्शनाखाली राम गोमारे, सहायक पोलीस निरीक्षक, गुन्हे शोध पथक यांनी blue ocean marine company, Icon tower unit no 102, कस्तुरी चौकाजवळ या ठिकाणी अचानक छापा टाकुन आरोपी नामे

१) विजय प्रताप सिंग, वय ४४, रा. अमर जाधव यांची रूम, साई नगर, मामुर्डी, पुणे मुळ गाव रा. पो. सलामतपुर, जि. गाजीपुर, उत्तर प्रदेश

२) किसन देव पांडे, वय ३५, रा. अमर जाधव यांची रूम, साईनगर, मामुडीं, पुणे मुळ गाव रा. माजापुर, जि. सुलतानपुर, उत्तरप्रदेश

३) हेमंत सिताराम पाटील, वय ३८, रा. लेखा फार्मच्या मागे, मुकाई चौक, रॉयल पार्क, फ्लॅ नं १०२, किवळे, पुणे मुळ गाव रा. गवळे नगर, ता. धुळे, जि. धुळे यांना ताबेल घेवून त्यांचे ऑफीसमधुन ब्रुनेई देशात वेल्डर, ड्रायव्हर, प्लंबर इत्यादी साठी कामगार हवे असल्याच्या बनावट वर्क ऑर्डर व ६७ पासपोर्ट जप्त केले, त्यातील ४८ पासपोर्टवर NEGARA BRUNEI DARUSSALAM या देशाचे व्हिसा वे खोटे शिक्के आहेत.

तसेच सदर ठिकाणाहुन दोन लॅपटॉप एक कॉम्पुटर व ७ मोबाईल, बनावट शिक्के असा एकुण १,६८,१५०/- रुपये किंमतीचा मुददेमाल जप्त करण्यात आला आहे. यातील आरोपींना दिनांक २८/०१/२०२४ रोजी ०१/३० वा. अटक करण्यात आली आहे. सदर आरोपीकडे चौकशी केली असता ते पुढील ७ दिवसात त्यांचे कार्यालय बंद करून पळुन जाणार होते. अशी माहीती मिळाली आहे.

सदर गुन्हयाच्या तपासा दरम्यान तपास पथकाचे अधिकारी राम गोमारे सहायक पोलीस निरीक्षक यांनी यातील आरोपी नामे हेमंत पाटील याचेकडे कौशल्याने तपास करता, त्या तीधांनी NEGARA BRUNEI DARUSSALAM या देशाचा व्हिसाचा बनावट शिक्का तयार करून घेतल्याचे सांगुन तो कोठे बनवला ते दाखवले. त्या ठिकाणी जाऊन पहाता सदर दुकान युनिक प्रिंटर्स अँड झेरॉक्स, गाळा नंबर ५ व ६, श्रीजी टेरेस बिल्डींग, शिवसाई चौक, पुर्णानगर, चिखली पुणे हे असुन त्याचे मालक किरण अर्जुन राऊत, वय ३४, रा. शिव अपार्टमेंट, फ्लॅ नं १३, शाहु नगर, चिंचवड, पुणे हे आहेत. सदर दुकानावर “या बसा शिक्के घेऊनच जा अशी मोठ्या अक्षरात जाहीरात केलेली आहे. मालक किरण राऊत यांना विश्वासात घेऊन तपास करता त्यांनी आरोपींची कोणत्याही प्रकारची खात्री न करता, अगर त्यांचेकडे शिक्के बनवण्यासाठीचे अधिकार आहेत काय हे न तपासता पैशाचे लालसेने NEGARA BRUNEI DARUSSALAM या देशाचा व्हिजाचा बनावट शिक्का तसेच इतर शिक्केही बनऊन दिल्याचे सांगीतलेने, त्यांनी बनावट शिक्के बनवण्यासाठी वापरलेले मशीन व इतर साहीत्य अशी ६०,३८०/- रू चा मुद्देमाल जप्त करून किरण अर्जुन राऊत, वय ३४, रा. शिव अपार्टमेंट, फ्लॅ नं १३, शाहु नगर, चिंचवड, पुणे यांना दाखल गुन्ह्याचे कामी दि. १/०२/२०२४ रोजी २१:०० वा. अटक करण्यात आली आहे.

पुढील तपासात आरोपी विजयप्रताप सिंग याने त्याचे राहते परिसरातील डिटॉक्स लॉड्री, शॉप नं. २. ग्राऊंड फ्लोअर, गजानन सोसा., साई मंदीरजवळ, साईनगर देहुरोड, मामुर्डी, पुणे चे मालक शिरीष आनंद वानखेडे, वय ५७, रा. सिंधुनगर, एलआयसी कॉलनी, से. २५. घ.नं. ११/२, निगडी प्राधिकरण, पुणे यांचेकडे काही पासपोर्ट ठेवले असल्याचे समजलेने डिटॉक्स लाँड्री येथे जाऊन मालक शिरीष वानखेडे यांना विश्वासात घेऊन तपास करता त्यांनी आरोपी विजयप्रताप सिंग यास ४ महीन्यापासुन ओळखत असून, त्याने महत्वाची कागदपत्रे म्हणून ठेवण्यास दिलेली पिशवी हजर केली. त्यामध्ये एकंदरीत ५८ पासपोर्ट मिळुन आले ते पंचनाम्याने जप्त करण्यात आले.

अशा प्रकारे बनावट व्हिजा बनऊन त्याद्वारे तरूणांना परदेशात नोकरी करण्याचे स्वप्न दाखऊन त्यांचेकडे रक्कम उकळुन, सात दिवसात पळून जाण्याचा मनसुबा रचणारे आरोपीतांना कौशल्याने वेळीच अटक करून त्यांचेकडून एकुण १२५ नागरीकांचे पासपोर्ट जप्त करून, तसेच त्यांना बनावट शिक्के बनऊन देऊन त्यांच्यात सामील होणारे आरोपीस अटक करून विशेष कामगीरी केली आहे.

सदरची कामगीरी मा.श्री विनयकुमार चौबे सो।, पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय, मा. श्री बापु बांगर, पोलीस उप आयुक्त परिमंडळ २ पिंपरी चिंचवड, मा. श्री डॉ. विशाल हिरे, सहा. पोलीस आयुक्त वाकड विभाग पिंपरी चिंचवड, मा. श्री श्रीराम पौळ, वरिष्ठ पोलीस निरीक्षक हिंजवडी पोलीस ठाणे, पिंपरी चिंचवड यांचे मार्गदर्शनाखाली हिंजवडी पोलीस ठाणेकडील तपास पथकातील, राम गोमारे सहा. पोलीस निरीक्षक, सहा. पोलीस उप निरीक्षक बंडु मारणे, बाळकृष्ण शिंदे, बापुसाहेब धुमाळ, नरेश बलसाने, पो. हवालदार कुणाल शिंदे, कैलास केंगले, विक्रम कुदळ, योगेश शिंदे, मंगेश सराटे, पोलीस नाईक रितेश कोळी, अरुण नरळे, श्रीकांत चव्हाण, चंद्रकांत गडदे, पोलीस शिपाई अमर राणे, कारभारी पालवे, ओमप्रकाश कांबळे, दत्तात्रय शिंदे व सागर पंडीत यांनी केली.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट