दहिसर मधील अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यास बृहमुंबई महानगर पालिकेकडून दिरंगाई…!

0
Spread the love

संपादिका – दिप्ती भोगल

दहिसर :- सप्टेंबर २०२३ मधे मनपा वार्ड क्रमांक ०३, एस. वी. रोड व लिंक रोड जवळ, संभाजी नगर शेजारी, मेट्रो रेल्वे पुलाच्या खाली मेट्रो पोल क्र. 2A / 26A मेट्रोच्या अखत्यारीत येणाऱ्या जमिनीवरती रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) गटाकडून अनधिकृतपणे कब्जा केला गेला असल्याचे “बिरसा मुंडा आदिवासी श्रमिक संघटनेने” बृहमुंबई महानगरपालिका आर उत्तर विभाग यांचे निदर्शनास आणून दिले होते.

परंतु अद्याप या अनधिकृत बांधकामावर पालिकेने कोणतीही कारवाई केलेली नाही.गरिबांच्या झोपड्यांवर हातोडा चालवणारी महानगर पालिका या अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यास दिरंगाई करत आहे. या जागेवर मोठे लोखंडी पत्र्याचे कंटेनर आणून पक्षाचे संपर्क कार्यालय बनविले आहे. अनधिकृत पाणी कनेक्शन देखील घेतले आहे.

त्याचबरोबर बाजूला रिकामी असलेली जागा RPI कार्यकर्त्यांनी रोपवाटिका आणि मडके बनवणाऱ्या कुंभाराना दरमहा भाड्याने देऊन उत्पन्नाचं हुकमी साधन बनवलेलं आहे. पालिकेकडे या प्रकरणाचा पाठपुरावा केला असता, अनधिकृत बांधकाम हटवण्यासाठी पोलीस प्रशासन आम्हाला पोलीस संरक्षण देत नाहीत अशा उत्तराने वेळ मारून नेण्याचा प्रयत्न पालिकेकडून केला जात आहे.



यामधे नक्कीच मोठ्या राजकीय नेत्याचा दबाव असल्याने पालिका कारवाई करण्यास चालढकल करत आहे. असे “बिरसा मुंडा आदिवासी श्रमिक संघटनेचे” म्हणणे आहे.

पालिकेचा असा भोंगळ कारभार आणि राजकारणचा होत असलेला हस्तक्षेप पाहता सामान्य जनतेला न्याय मिळणे फार कठीण होऊन बसले आहे. असे श्री. देवेंद्र ठाकुर यांनी वेळोवेळी निदर्शनास आणून दिले आहे.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट