नालासोपारात अलकापुरी प्रीमियर लीग तर्फे बॉक्स क्रिकेट सामान्यांचे आयोजन संपन्न…

प्रतिनिधी-मंगेश घडवले
नालासोपारा :– नालासोपारा रविवार दि. २५ फेब्रुवारी २०२४ रोजी युवा बॉईज प्रतिष्ठान तर्फे “अलकापुरी प्रेमिअर लीग २०२४ – पर्व ८ ” बॉक्स क्रिकेट चे सामने झालावाड मैदानात आयोजित करण्यात आले होते.




या कार्यक्रमात प्रमुख मान्यवर युवा आमदार मा. श्री . क्षितिजजी ठाकूर , श्री. रुपेशजी जाधव – माजी महापौर , श्री निलेशजी देशमुख -माजी सभापती , माजी नगरसेवक श्री. हार्दिकजी राऊत , श्री चंद्रकांत गोरिवले , सौ. विमल पाटील , श्री. भुपेन पाटील , श्री. वैभव पाटील तसेच बहुजन विकास आघाडीचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.


या अलकापुरी प्रेमिअर लीगचे मानकरी ” विंध्य लायन्स” कर्णदार – अक्षय महाडिक / संघमालक – सौ. विजया तोरणकर ,उपविजेता संघ – “गिरनार स्टार्स “कर्णदार – प्रतिक मोरे / संघ मालक – श्री. भूपेन पाटिल आणि तृतीय क्रमांक “अरवली फाईटर्स ” कर्णदार – सुशिल काकड़े / संघ मालक – सौ रेणुका जाधव हे संघ मानकरी ठरले .

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी युवा बॉईज प्रतिष्ठानच्या सर्व सभासदांनी आपला विशेष सहभाग दर्शविला.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com