४ महिन्यापूर्वी घर सोडून मध्यप्रदेशात निघून गेलेल्या बालकाला परत आणल्याबद्दल ५ लाखाचे बक्षीस..!

0
Spread the love

उपसंपादक-रणजित मस्के

पुणे :-रागाच्या भरात ४ महिन्यापूर्वी घरातून निघून गेलेल्या अल्पवयीन मुलाला मध्य प्रदेश जबलपूर येथून ताब्यात घेऊन त्याच्या आई-वडिलांच्या ताब्यात सुखरूप देण्यात आले. पोलीसांच्या कौतुकास्पद कामगिरी बद्दल पोलीस आयुक्तांनी ५ लाखांचे बक्षीस जाहीर करण्यात आले.

अल्पवयीन बालक हा गेली ४ महिने झाले राहते घरातून रागाचे भरात निघून गेला होता.
४ महिन्यापूर्वी भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन येथे अल्पवयीन मुलाच्या मिसिंग संदर्भात तक्रार दाखल करण्यात आली होती.

पुणे पोलीस अल्पवयीन मुलाचा शोध घेत होते, बालक मिळून येत नसल्याने त्यास बक्षीस देखील जाहीर करण्यात आले होते. वेगवेगळ्या राज्याच्या पोलीस स्टेशनमध्ये, बालकाचे फोटो इतर राज्यात पाठवून सदर बालका बाबत माहिती असल्यास कळवावे व याबाबत अनेक राज्यात फोटो पाठवण्यात आले होते.

स्वारगेट पोलिसांना माहिती मिळाली की भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन येथील , चार महिन्यांपूर्वी घरातून निघून गेलेला अल्पवयीन मुलगा हा जबलपूर मध्य प्रदेश येथील रेल्वे स्थानकावर दिसून आला आहे, या संदर्भातील माहिती वरिष्ठांना कळवून, पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ-२, मा. स्मार्तना पाटील, यांच्या मार्गदर्शनाखाली, जबलपूर मध्य प्रदेश येथील रेल्वे स्टेशन परिसरातून मुलाला ताब्यात घेतले. पुणे शहर येथे घेऊन येवुन त्याच्या आई वडिलांच्या ताब्यात सुखरूप देण्यात आले आहे.

पोलीसांच्या कौतुकास्पद कामगिरी बद्दल पोलीस आयुक्तांनी ५ लाखांचे बक्षीस जाहीर केले आहे.

भारती विद्यापीठ पोलीस ठाणे, पुणे शहर गु.र.नं.२१७/२०२४ भा.द.वि. कलम ३६३ अन्वये

दाखल असून दाखल गुन्ह्यातील अल्पवयीन बालक हा गेली चार महिने झाले राहते घरातून रागाचे भरात निघून गेला होता. सदर बालकाचा शोध पुणे पोलीसाकडुन चालू होता. अशातच गेली चार
महिन्यापासून बालक मिळून येत नसल्याने त्यास बक्षीस देखील जाहीर करण्यात आले होते. तरी सदर बालक याचा शोध लागत नसल्याने त्या अनुषंगाने बालकाचे फोटो इतर राज्यात पाठवून सदर बालका बाबत माहिती असल्यास प्रत्यक्ष फोन व्दारे कळवावे याबाबत अनेक राज्यात फोटो पाठवण्यात आले होते.

त्यावरून सदरचे बालक हे जबलपूर मध्य प्रदेश येथील रेल्वे स्थानकावर दिसून आल्याचे खात्री दायक माहिती स्वारगेट तपास पथकाचे सह प्रभारी पो.उप निरी अशोक येवले यांना लागली. असता त्यानी तात्काळ सदरची माहीती मा. पोलीस उपायुक्त परिमंडळ २ श्रीमती स्मार्तना पाटील मॅडम व वरिष्ठ पोलीस निरीक्षक भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन श्री. दशरथ पाटील. यांना कळवुन तेथील स्थानिक पोलिसांच्या मदतीने सदर बालकास ताब्यात घेण्यात आले तसेच तात्काळ मा. पोलीस उपायुक्त परिमंडळ २ श्रीमती स्मार्तना पाटील मॅडम यांच्या सूचना व मार्गदर्शननुसार सदर बालकास ताब्यात घेण्याकरता स्वारगेट पोलीस स्टेशन येथे तपास पथक टीम रवाना करुन सदर बालक यास आज रोजी जबलपूर मध्य प्रदेश येथुन ताब्यात घेऊन पुणे शहर येथे घेऊन येवुन त्याच्या आई-वडिलांच्या ताब्यात सुखरूप देण्यात आले आहे.

सदर केलेल्या उल्लखनीय कामगीरी बद्दल मा. पोलीस आयुक्त पुणे शहर यांनी पाच लाखाचे बक्षीस जाहीर केले आहे.

सदरची कामगीरी ही मा. अप्पर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग, पुणे शहर, श्री प्रविण पाटील मा. पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ-२, पुणे शहर श्रीमती स्मर्तना पाटील, मा. सहा. पोलीस आयुक्त, स्वारगेट विभाग, पुणे शहर, श्रीमती नंदिनी वग्यानी, यांचे मार्गदर्शना खाली वपोनी भारती विद्यापीठ पो.स्टे. दशरथ पाटील वपोनी स्वारगेट पो.स्टे. दिलीप फुलपगारे यांच्या सुचना व आदेशान्वये तपास पथकातील उपनिरीक्षक अशोक येवले व पो. अंमलदार फिरोज शेख, हर्षल शिंदे यांनी केली आहे.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट