एम एच बी कॉलनी पो ठाणे व सांताक्रूझ पोलीस ठाणे येथून बुलेट मोटार/सायकल चोरी करणाऱ्या दोन आरोपींना गुजरात येथुन केले अटक…
उपसंपादक – रणजित मस्के
बोरिवली : ➡️ 1. एमएचबी कॉलनी पो ठाणे मुंबई गु.र.क्र. 145/23 कलम 379 भादवि
- सांताक्रूझ पोलीस ठाणे गुरक्र 258/2023 कलम 379 IPC
➡️ गुन्हा दाखल दिनांक व वेळ 29/03/2023 रोजी 16.10 वा.
➡️ फिर्यादी
श्री. राज मनीष भट्ट, वय 26 वर्षे,
➡️ थोडक्यात हकीकत
दिनांक 28/03/2023 रोजी रात्री 22.30 वाजेपासून ते दिनांक 29/03/2023 रोजी सकाळी 8.30 वाजेपर्यंत फिर्यादी यांनी त्यांचे मालकीची रॉयल एनफिल्ड कंपनीची बुलेट मोटार सायकल ही त्यांचे राहते घरासमोर पार्क केली असता कुणीतरी अज्ञात इसमाने त्यांची मोटार सायकल चोरून नेली.

➡️ तपास
वर नमूद घटनास्थळी जावून तेथील CCTV कॅमेरे तपासले असता दोन अनोळखी इसम हे मोटार सायकल चोरी करून जाताना दिसून आले त्यावरून जवळपास राहणाऱ्या नागरिकांकडे त्यांचे फोटो दाखवून आरोपी बाबत तपास केला असता एकाने चोरी करणाऱ्या दोन इसमांपैकी एकास ओळखून नमूद इसम हा राज्य गुजरात येथील असून काही दिवसांपूर्वी मुंबई येथे काम करत असल्याचे सांगितल्याने नमुद अनोळखी चोराबाबत परिसरात आणखी तपास केला असता त्याचेसोबत काम करणारा चोराला ओळखणारा एक इसम मिळून आला , त्यांचेकडून चोराचा मोबाईल नंबर प्राप्त करून त्याचे लोकेशन घेतले असता तो गुजरात येथे असल्याचे समजले, त्यानंतर नमूद मोबाईल क्रमांकाच्या CDR विश्लेषण करून आरोपी हा पूनेश वेला कोली हा असून तो बहादूरगड, कच्छ, गुजरात येथील राहणारा असल्याचे समजल्याने गुजरात राज्य येथे तपास करून आरोपीचे लोकेशन मिळवून आरोपीस ताब्यात घेण्यात आले व त्याचेकडून त्याचे साथीदाराच्या पत्ता घेवुन दुसरा आरोपी संजय शिवाभाई कोली यास ताब्यात घेतले, आरोपी कडे सखोल तपास केला असता त्यांनी सांताक्रूझ पोलीस ठाणे परिसरातून काही दिवसांपूर्वी 1 आणखी बुलेट मोटार सायकल चोरी केल्याचे सांगून दोन्ही गाड्या या गरेजला modify करण्यास दिल्याचे सांगताच नमूद गॅरेज येथे जावून दोन बुलेट मोटर सायकल पंचनामा करून ताब्यात घेण्यात आल्या. व नमूद आरोपी यांचेसह गुन्ह्यातील गाड्या पोलीस ठाणे येथे आणल्या .
➡️ अटक आरोपी
- पुनेश वेला कोली, 24 वर्ष, राहणार बहादूरगड, जिल्हा कच्छ, गुजरात
- संजय शिवाभाई कोली उर्फ घोघणी, वय 22 वर्ष, राहणार- गोडपर, तालुका बचाऊ, गुजरात
हस्तगत मालमत्ता –
रॉयल एनफिल्ड कंपनीच्या 2 बुलेट मोटार सायकल एकूण किंमत अंदाजे – 2,75,000/-
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com