चोरीचा प्रयत्न करतांना मिळुन आलेल्या दोन आरोपीना कलम 379 आणि 511 भादवी मध्ये 200/-रु. दंडाची शिक्षा व कोर्ट संपेपर्यंत कोर्टात बसून राहण्याची शिक्षा ठोठावण्यात आली आहे..

उपसंपादक – रणजित मस्के
गोंदिया :-▶️ याबाबत थोडक्यात प्रकरण असे की, फिर्यादी – सुरजकुमारसिंह सुरेशसिंह भारद्वाज वय 31 रा. मंगेहेयाचक ह. मु. गडमाता मंदिर जवळ, सालेकसा ता. सालेकसा जि. गोंदिया यांचे पि. व्ही. आर. ई. सी.पी.एल. या कंपनीचे देखरेखित सुरु असलेल्या गडमाता पहाडी जवळील सोनारटोला रेल्वे फाटकच्या मधात रेल्वेच्या रुळावरील पुलिया न.225 चे बांधकाम करण्याकरिता ठेवण्यात आलेले 10 एम. एम.चे 04 क्विंटल लोखंडी सलाखापैकी 01 नग लोखंडी सलाख 10 एम. एम. ची की. 400/- रु.चा माल यातील आरोपी नामे – 1)सोमेश्वर जयलाल कटरे वय 32 वर्ष 2) धनलाल सुकलाल कटरे वय 65 वर्षे दोन्ही रा. दरबडा ता.सालेकसा जि. गोंदिया दोन्ही हे घटना दिनांक -23/05/2024 चे 15/00 वा दरम्यान चोरी करून नेण्याचा प्रयत्न करीत असतांना मिळून आल्याने फिर्यादीचे तोंडी रिपोर्ट वरून पो.ठाणे सालेकसा येथे अप क्र. 152/2024 कलम 379, 511 भादवी.अन्वये दिनांक 23/05/2024 चे 21/36 वा. गुन्हा दाखल करण्यात आलेला होता...... सदर गुन्ह्याचा तपास पूर्ण करुन मां. न्यायालयात नमूद आरोपी यांचे विरूध्द गुन्ह्यात दोषारोप पत्र न्यायास्तव सादर करण्यात आले........सदर गुन्ह्याचे केस क्र - 96/2024 प्रमाणे मा.न्यायालयात खटला चालविण्यात आला.....सदर खटल्याचे सुनावणीत मा. न्यायालय आमगाव, यांनी न्यायनिवाडा करत नमूद गुन्ह्यातील दोन्ही आरोपीतांना मा. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी आमगाव यांनी आज दिनांक - 03/06/2024 रोजी कलम 379 आणि 511 भादवी मध्ये 200/-रु. दंडाची शिक्षा व कोर्ट संपेपर्यंत कोर्टात बसून राहण्याची शिक्षा ठोठावली आहे.सदर गुन्ह्याचा तपास तपासी अधिकारी- पोहवा. नारायण खांडवाहे पो.स्टे. सालेकसा यांनी केले असून मा. न्यायालयात सरकारी वकील म्हणून - श्रीमती रंगारी मॅडम, यांनी सरकार पक्षातर्फे न्यायालयात बाजू मांडली कोर्ट पैरवी कामकाज सफौ. फुंडे, यांनी तर कोर्ट मोहरर म्हणून मपोशी. बहेकार, पो. स्टे सालेकसा यांनी न्यायालयीन कामकाज पाहिले....</code></pre></li>
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com