चिलाईवाडी खुन प्रकरणातील दोन आरोपी अटक वकील आरोपीचा शोध सुरु…

0
Spread the love

उपसंपादक – रणजित मस्के

पंढरपूर : मा. पोलीस अधिक्षक सो श्री शिरीष सरदेशपांडे सो व अपर पोलीस अधिक्षक सो। श्री हिंमत जाधव तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी सो पंढरपुर विभाग श्री विक्रम कदम सो यांचे मार्गदर्शनखाली करकंब पोलीस ठाणेचे गु.र.नं. १०२ / २०२३ भादविस ३०२, २०१, ५०४,३४ मधील आरोपींचा तात्काळ शोध घेवून • अटक करणेबाबत सुचना दिलेल्या होत्या.

करकंब पोलीस ठाणेस दिनांक ११/०३/२०२३ रोजी सकाळी १०/०० चे सुमारास पोलीस पाटील चिलाईवाडी पोलीस पाटील यांनी माहीती दिली की, गावातील वामन जमदाडे हे विहीरीमध्ये पडलेले दिसत आहेत व मोटर पंपवरील फयुजवर व गवतावर रक्त दिसत आहे. त्यानंतर पोलीस तात्काळ पोहचुन त्यांनी पंचनामा करून मयत बॉडी वर काढले तेव्हा सदरचे मयत संशयास्पद रित्या डोक्यावर घातक हत्याराने हल्ला करुन गुन्हा करुन पुरावा नष्ट करण्याचे उददेशाने त्याला विहीरीत टाकुन दिल्याचे प्रथमदर्शी दिसले. त्यानंतर मयताचे मुलगा रमेश वामन जमदाडे याने सांगीतले की, ‘रात्री त्याचे वडीलांना मोटार चालु करण्याकरीता सांगितल्याने वडील एकटेच मोटार सायकलवरून विहीरीवर गेले. त्यानंतर झोपलो. दिनांक ११/०३/२०२३ रोजी सकाळी ०६/०० वाजता ते उठलो त्यानंतर वडील कोठे आहेत असे आईस विचारले असता तीने रात्री ०१/३० वा चे सुमारास मोटार चालु करायला गेलेले अजुन घरी आले नाहीत असे सांगितले’ त्यानंतर आम्ही सकाळी ०८/०० वा ते १०/०० दरम्यान शोध घेतला असता ते त्यांचेच विहीरीमध्ये खोल विहीरीत पडल्याचे दिसले. त्यानंतर पोलीसांनी पंचनामा व शासकीय दवाखाना करकंब येथे पी एम केला. मुलगा रमेश वामन जमदाडे याने त्यांचे शेजारी बांधकरी असणारे अनिल कुडंलिक माळी, दत्तात्रय कुडलिंक माळी, अॅड. भारत कुडलिंक माळी यांचेत शेतातील रस्त्याचे कारणावरून गेली १० वर्षापासुन वाद सुरु होता सदर वादामुळे वरील लोकांनी आमचे विरूध्द पंढरपुर दिवानी कोर्टात दावा दाखल केला होता. त्याची सुनावणी करीता काल दि.१०/०३/२०२३ रोजी मयत वडील वामन तसेच चुलत भावाचा मुलगा बाळासाहेब नागनाथ जमदाडे, नानासो बाबासो सलगर असे कोर्टात गेले असता अॅड. भारत माळी याने वडीलांना ‘तुला बघुन घेतो’ अशी धमकी दिली होती ती वडीलांनी त्यांना घरी आल्यानंतर सांगितले होते. तसेच यापुर्वी ही आमचे समक्ष वरील लोकांनी बघुन घेतो अशी धमकी दिली होती त्यानंतर लगेच दुस-या दिवशी खुन झाला आहे. म्हणुन मयताचा मुलाने त्यांचे वडीलाचा खुन करुन पाण्यात टाकुन जीवे ठार मारले तकार दिलेली आहे. म्हणुन अनिल कुडंलिक शिंदे माळी, दत्तात्रय कुडलिंक शिंदे माळी, अॅड भारत कुडलिंक शिंदे माळी सर्व रा. चिलाईवाडी ता. पंढरपुर यांचे विरुध्द तक्रार दिलेली होती. सदरच्या घटनास्थळावर तात्काळ उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देवुन सुचना दिल्या त्याप्रमाणे सपोनि / निलेश तारु सो यांनी दोन पथके तयार केले व आरोपी शोध घेण्यास सुरुवात केली असता आरोपी घरातुन फरार असल्याचे दिसुन आले. त्यानंतर दिनांक १२/०३/२०२३ रोजी दत्तात्रय शिंदे माळी व दिनांक १७ /०३ /२०२३ रोजी ज्ञानोबा उर्फ अनिल कुंडलिक शिंदे माळी रा. चिलाईवाडी यांना गोपनिय बातमीदार यांचे मार्फतिने शोध घेवुन अटक करुन पोलीस कोठडी घेण्यात आलेली आहे. तसेच आरोपी नंबर ३ अॅड. भारत शिंदे माळी यांचा शोध सुरु आहे.

सदरची कामगीरी श्री शिरीष सरदेशपांडे सो व अपर पोलीस अधिक्षक सो श्री हिंमत जाधव तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी सो। पंढरपुर विभाग श्री विक्रम कदम सो यांचे मार्गदर्शनखाली करकंब पोलीस ठाणेचे सपोनि / निलेश तारु, पोउपनि / अजित मोरे, पोहवा / घोळवे, आर आर जाधव, बापु मोरे, सागर भोसले, गोरवे, पोना / अभि कांबळे, अशोक भोसले, एकतपुरे, हजारे, वाघमारे, सावंत, पोकॉ / श्याम गायकवाड, स्वप्निल बागल तसेच सायबर पोलीस ठाणेकडील पोकॉ/ अनवर आत्तार यांनी कामगीरी बजावली आहे.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः

मोबा.नं. 9920601001

info@surakshapolicetimes.com

diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट