पिस्तूल बाळगणाऱ्या दोघांना अटक
उपसंपादक -रणजित मस्के
खेड शिवापूर : कोंढणपूर (ता. हवेली) गावच्या हद्दीत हॉटेलजवळ थांबलेल्या दोन युवकांकडून गावठी पिस्तूल व जिवंत काडतूस हस्तगत करण्यात आले. दीपक ऊर्फ भय्याजी धनाजी जगताप (वय २६, रा. रांजे, ता. भोर), सागर नानासाहेब लिम्हण (वय २३, रा. पारवडी, ता. भोर) अशी त्यांची नावे आहेत.

राजगड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिस निरीक्षक सचिन पाटील यांना खबऱ्याकडून कोंढणपूर
गावच्या हद्दीत सिंहगड पायथ्याला २ असलेल्या एका हॉटेलजवळ उभ्या असलेल्या दोन युवकांकडे गावठी पिस्तूल असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिस निरीक्षक सचिन पाटील, सहायक पोलिस निरीक्षक मनोजकुमार नवसरे, हवालदार अजित माने, संतोष तोडकर, प्रमिला निकम, सोमनाथ जाधव, पप्पू शिंदे यांनी आरोपींना अटक केली. सदर आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. तपास पोलिस हवालदार संतोष तोडकर करीत आहेत.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com