बांद्रा -अजमेर व मैसूर -अजमेर दोन गाड्यांचा थांबा पालघर येथे:- केदार काळे
प्रतिनिधी-महेश वैद्य
पालघर : दिनांक 24 मार्च 2023 कोरोना मध्ये बंद झालेल्या गाड्या सुरू कराव्यात म्हणून डी आर यु सी सी सदस्य केदार काळे यांनी डी आर यु सी सी च्या मीटिंगमध्ये अनेक वेळा हा विषय आग्राने मांडला होता.
प्रोसिडिंग वरती ही विषयाला आहे .तेव्हा डीआरएम यांनी सांगितले होते आम्ही रेल्वे बोर्डाकडे हा विषय पाठवला आहे व मंजूर करून घेऊ .

पालघर येथील अजमेर ला जाणारे अनेक भाविक आहेत. तसेच पुष्कर येथेही जाणारे अनेक भाविक आहेत. त्यांच्यासाठी गाडी ही अत्यंत महत्त्वाची होती .रेल्वे जनरल मॅनेजर ,रेल्वे डी आर ए यांना अनेकदा निवेदन घेऊन झाली. मध्यंतरी खासदार राजेंद्र गावित साहेब व केदार काळे रेल्वे मंत्र्यांना भेटून हा विषय ही त्यांच्यासमोर मांडला होता. अनेक पत्रकारांनी व रेल्वे प्रवाशांनी हा विषय सतत लावून धरला.म्हणून 30 मार्चपासून ह्या गाड्या सुरू होत आहे .

गुढीपाडवा झाला, रामनवमी, हनुमान जयंती , अक्षय तृतीया हे हिंदूंचे सण येत आहेत.
तसेच मुस्लिमांचा पवित्र रमजान महिना सुरू झाला आहे व रमजान ईद ही लवकर येणार आहे .अशा वेळेस पुष्करला जाण्यासाठी व अजमेरला जाण्यासाठी गाड्या सुरू झाल्याबद्दल प्रवासी, आदरणीय रेल्वेमंत्री, आदरणीय खासदार श्री राजेंद्र गावित, पश्चिम रेल्वेचे जनरल मॅनेजर ,पश्चिम रेल्वेचे डी आर ए व डी आर यु सी सदस्य केदार काळे , आमदार , खासदार यांनी यासाठी प्रयत्न केले. अशा सर्वांच्या आभार मानले आहे. सोबत पालघरला उभे राहण्याची वेळ देत आहे.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com