बोरीवलीत मा. आमदार श्री सुनील राणे प्रेझेंट रंगरात्री दांडिया नाईट्स सीझन २ विथ कींजल दवे बनावट पास गुन्हा १२ तासात उघडकीस आणून ४ आरोपिना अटक ३६ लाख रुपयांची मालमत्ता एम एच बी काॅलनी पोलीसांकडून हस्तगत…

0
Spread the love

उपसंपादक-रणजित मस्के

बोरीवली:

➡️ एम एच बी कॉलनी पोलीस ठाणे गु र क्र 550/2023 कलम 420,465 भादवी

➡️ फिर्यादी :- श्री नीरव घनश्याम मेहता , वय 38 वर्ष, धंदा व्यवसाय, रा.ठी.बी/205 विशाल नं 03 चिकन विला रोड सोनिवाडी शिंपोली, बोरिवली पश्चिम मुंबई.

➡️ गुन्ह्याची थोडक्यात हकीकत
दिनांक 14/10/2023 रोजी संध्याकाळी 23.30 वाजता दरम्यान अनोळखी इसम याने दुर्गादेवी नवरात्र उत्सव समिती बोरीवली व आमदार श्री सुनिल राणे प्रस्तुत रंगरात्री दांडीया विथ किंजल दवे या कार्यक्रमाच्या आयोजकांची आर्थिक फसवणुक करण्याच्या उद्देशने प्बनावट प्रवेशिका तयार करून फसवणुक केली म्हणून गुन्हा नोंद आहे .

➡️ तपास

सदर गुन्हा नोंद होताच नमूद गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधीर कुडाळकर यांनी तत्काळ पो उ नी डॉ दिपक हिंडे यांचे सोबत खाली नमूद पथक नेमून गुन्हा उघडकीस करण्या संदर्भात सूचना देण्यात आल्या.
गुन्ह्याचा तपास करत असताना साक्षीदार यांचा जबाब नोंद केले असता त्यात इसम नामे करण अजय शाह , वय २९ वर्ष , आरोपी नामे दर्शन प्रवीण गोहिल, वय-२४ वर्ष, परेश सुरेश नेवरेकर , वय ३५ वर्ष, , कविष भालचंद्र पाटील वय २४ वर्ष, यांचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्याने , नमूद गुन्ह्याचे अनुषंगाने सदर इसमाचा त्याचे राहते घराचे विरार, कांदिवली पूर्व, मालाड मनोरी, या परिसरात मोबाईल लोकेशन वरून शोध घेतला असता तसेच 20 ते 25 साक्षीदार यांची पडताळणी केली असता ते मिळून आले. सदर इसमाकडे नमूद गुन्ह्याचे अनुषंगाने चौकशी केली असता त्याचा नमूद गुन्ह्यात सहभाग निष्पन्न झाल्याने त्यास अटकेची कारणे सांगून अटक करण्यात आली.
सदर गुन्ह्यातील मुख्य आरोपी करण शहा हा ग्राफिक डिाझाईनर असून त्याने फर्झी नावाचे वेब सिरीज वरून प्रोत्साहित होऊन नमूद गुन्हा केल्याचे निदर्शनास आले आहे.

सदर आरोपी याने त्याचे नाव व पत्ता कोणालाही सांगितलं नसल्याने अत्यंत कौशल्याने नमूद आरोपी नामे करण शाह यास गोपनीय बातमीदार, तांत्रिक कौशल्य याचा वापर करून नमूद गुन्हा उघडकीस आणला आहे.

➡️ हस्तगत मालमत्ता

१) १०००( पर पास किंमत ३००० रुपये ) बनावट पासेस किंमत अंदाजे ३० लाख रुपये

२) होलोग्रम स्टिकर १००० किंमत १० हजार रुपये

३) लॅपटॉप , प्रिंटर व इतर साधन सामुग्री किंमत अंदाजे 5 लाख रुपये

एकूण हस्तगत किँमत 35 लाख 10 हजार रुपये ची मालमत्ता

➡️ अटक आरोपी

1) करण अजय शाह , वय २९ वर्ष , रा ठी बी १०३, गज अपार्टमेंट , समर कॉम्प्लेक्स, अगाशी रोड, बोलिंज, विरार पश्चिम मुम्बई,
२) दर्शन प्रवीण गोहिल, वय-२४ वर्ष, व्यवसाय-नोकरी, रा ठी ४०७, ओं श्री, सिद्धेश्वर बिल्डिंग, कारटर रोड नंबर ०५, राय डोंगरी, विठ्ठल मंदिर जवळ, बोरिवली पूर्व, मुंबई ,
३) परेश सुरेश नेवरेकर , वय ३५ वर्ष, व्यवसाय-नोकरी, रा. ठी मनोरी , भंडारवाडा, मालाड, पश्चिम , मुंबई. ,
४) कविष भालचंद्र पाटील वय २४ वर्ष, व्यवसाय-नोकरी, रा ठी मनोरी , गगणगिरी रोड, मनोरी जेट्टी, मालाड, पश्चिम , मुंबई .

पाहिजे आरोपी :- संतोष , स्वप्नील पूर्ण नाव व पत्ता माहीत नाही.

सदर गुन्ह्याचा तपास मा परिमंडळ ११ श्री अजयकुमार बन्सल यांचे मार्गदर्शनाखाली तसेच सहायक पोलीस आयुक्त धरणेंद्र कांबळे बो वि, तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक एम एच बी कॉलनी पोलीस ठाणे सुधीर कुडाळकर यांचे प्रत्यक्ष मार्गदर्शनाखाली करण्यात आला.

➡️ तपास पथक :- पो नी सचिन शिंदे , पो नी गुन्हे,
पो ऊ नि डॉ दिपक हिंडे,
पो ऊ नी मंगेश किरपेकर- तपासी अधिकारी,
पो ऊ नि मुकेश खरात,
पो शी प्रदीप घोडके,
पो शी अनंत शिरसाट,
मपोशी रुपाली दाईनगडे तांत्रिक सहाय्य यानी केल्याची माहिती
सुधीर कुडाळकर वरिष्ठ पोलीस निरीक्षक एम एच बी कॉलनी पोलीस ठाणे यानी दिली.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट