बोरीवलीत रस्त्यावरील मॅनहोलचे लोखंडी झाकण चोरी करणारे व मालखाऊ भंगार आरोपितांना अटक…

उपसंपादक – रणजित मस्के
बोरिवली :-दिनांक 20/06/2023 रोजी आर मध्य विभागबृहन्मुंबई महानगर पालिकेतर्फे फिर्यादी श्रीमती प्राजक्ता दिलीप दवंगे वय 26 यांनी आर मध्य विभाग, बृहन्मुंबई महानगर पालिका, मुंबई तर्फे पोलीस ठाणेस येवून तकार दिली की, कल्पना चावला रोड, शांती आश्रम बस डेपो, आय. सी कॉलनी, बोरीवली पश्चिम, मुंबई येथील डांबरी रोडवरील मध्यभागी असलेले मॅनहोलचे लोखंडी झाकण त्यावर MCGM लिहलेले व त्यापूर्वी विविध ठिकाणावरून एकुण 26 नग जुने वापरते लोखंडी झाकणहे कोणीतीरी अज्ञात इसमाने चोरी केलेले आहेत. त्यावरून फिर्यादी यांचा सविस्तर जबाब नोंद करून गुनो. कं 274 2023, कलम 379 भा.द.वि अन्वये नोंद करण्यात आला.
सदर गुन्हयाच्या तपासामध्ये गुन्हे प्रकटीकरण अधिकारी पोउनि अखिलेश बाँबे व पथक यांनी घटनास्थळावरील सी.सी.टी.व्ही फुटेज तपासले असता दिनांक 22/06/2023 रोजी आरोपी नामे कमलेश उर्फ बंटी जगदिश सोलंकी वय 29 यास सदर गुन्हयात आली. त्याचेकडे केलेल्या तपासामध्ये त्याने चोरी केलेले झाकण हे आरोपी नामे अब्दुल गली मोहम्मद नजीर शाह वय 51 यास विक्री केल्याचे आढळून आल्याने त्यास सदर गुन्हयात अटक करण्यात आली. नमुद आरोपित इसमांकडून सदर गुन्हयातील चोरी केलेले झाकणाची किंमत रुपये 9,500/- हस्तगत करण्यात आलेली आहे.
अटक आरोपित इसम नाव व पत्ता :-

1) कमलेश उर्फ बंटी जगदीश सोलंकी वय 29 व्यवसाय – चालक, रा. ठि गल्ली नं 1 गणपत पाटिल नगर, बोरीवली पश्चिम, मुंबई ( झाकण चोर )

(2) अब्दुल गणी माहेम्मद नजीर शहा वय 51 वर्षे, व्यवसाय भंगार विक्रेता, रा. ठि. ए7 श्री आंबेश्वर चाल त्रिवेदी कंपाउड, कांदरपाडा, दहिसर पश्चिम, मुंबई ( मालखाऊ )
सदर कारवाई मा. अपर पोलीस आयुक्त, उत्तर प्रादेशिक विभाग, मुंबई श्री. राजीव जैन, मा. पोलीस आयुक्त, परिमंडळ-11 मुंबई श्री. अजय कुमार बन्सल यांचे मार्गदर्शनाखाली श्री. धरणेंद्र कांबळे, मा. सपोआ बोरीवली विभाग, मुंबई, श्री. सुधीर कुडाळकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, एम. एच. बी कॉलनी पोलीस ठाणे, मुंबई व पोलीस निरीक्षक सचिन शिंदे यांचे प्रत्यक्ष देखरेखी खाली गुन्हे प्रकटीकरण अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक सूर्यकांत पवार, पोलीस उप निरीक्षक अखिलेश बाँबे, पो.ह. कं 990320/जोपळे, पो.ना.कं 090799 /देवकर, पो.शि.कं 080461/ आहेर, पो.शि.कं 130164/ शेरमाळे यांनी पुर्ण केलेली आहे…
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com