बोरिवली पोलीसांनी तीन हिस्ट्री शीटर चोरांना १० मोटर सायकलसह केली अटक …

उपसंपादक-रणजित मस्के
मुंबई :-बोरीवलीत पोलीसांनी चोरीच्या १० मोटारसायकली जप्त केल्या आहेत. बोरिवलीतील प्रेम नगर परिसरातून फिर्यादी मनीष निर्मळ यांची होंडा ॲक्टिव्हा चोरीला गेली.
याप्रकरणी पोलिसांनी तक्रार दाखल केली होती.रात्री गस्तीदरम्यान पोलिसांनी दोन जणांना संशयास्पद दिसले, त्यांची पूछताछ करत असताना एक आरोपी पळून गेला.
अटक आरोपी मिलिंद सावंत याच्याकडे चौकशी केली असता त्याच्यावर एमआयडीसी, मुलुंड, शिवाजी पार्कसह विविध पोलीस ठाण्यात एकूण १९ गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले. चौकशीत त्याने फरार आरोपी यश कोठारीसह अनेक वाहने चोरल्याची कबुली दिली.
त्यानंतर पोलिसांनी यश कोठारीसह अन्य एक आरोपी अरविंद गडकरीला वाहन चोरीच्या आरोपाखाली अटक केली. यशवर १४ तर अरविंदविरुद्ध ३ गुन्हे दाखल आहेत.सर्व आरोपींच्या चौकशीच्या आधारे पोलिसांनी एकूण 10 मोटारसायकली जप्त केल्या आहेत. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
मा.अतिरिक्त पोलीस आयुक्त राजीव जैन व पोलीस उपायुक्त आनंद भोईटे यांच्या सूचनेनुसार बोरिवली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक निनाद सावंत यांच्या पथकाने वरील कारवाई केली आहे.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com