बोरिवली दैवज्ञ सोनार समाज प्रकाशित दैवज्ञ दिनदर्शिका २०२५ मान्यवरांना सन्मानाने प्रदान…

संपादिका – दिप्ती भोगल
बोरीवली :-बोरिवली दैवज्ञ सोनार समाज च्या ४१ व्या वर्धापनदिन सोहळ्याचे औचित्य साधत सालाबादप्रमाणे दैवज्ञ दिनदर्शिका २०२५ चे नूकतेच प्रतिष्ठित मान्यवरांतर्फे जाहीर प्रकाशन झाले…









दैवज्ञ समाजातील प्रतिष्ठावंत प्रतिभावंत मान्यवरांना त्यांची सदिच्छाभेट घेत प्रदान करण्यात आले…समाजश्रेष्ठी मा. सुरेंद्र शंकरशेट व समाजश्रेष्ठी मा. डाॕ. गजानन पद्माकरराव रत्नपारखी, जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्सचे सर्वेसर्वा उद्योजक मा. डाॕ. आनंद जगन्नाथ पेडणेकर, मा. उदय शंकरशेट, दैवज्ञ सहकारी पतपेढी मर्यादित चे सचिव श्री. विनोद मडकईकर यांचेसह महाव्यवस्थापकः श्री.शिरिष देवरुखकर, श्री. शंकर नार्वेकर व लालबाग, गिरगाव, दादर, मालाड अधिकारी व कर्मचारी वर्ग हे होतया प्रसंगी बोरिवली दैवज्ञ सोनार समाजाचे उपाध्यक्ष तसेच दैवज्ञ सहकारी पतपेढी मर्यादित मालाड शाखा समिती प्रतिनीधी श्री. वासुदेव नार्वेकर यांच्यासह गिरगावचे ज्ञाती बांधव व दैवज्ञ सहकारी पतपेढी मर्यादित गिरगाव शाखा समिती प्रतिनिधी श्री. दिनेश पोतदार हे साथसोबत उपस्थित होते…