महाराष्ट्रात “Adv. संरक्षण कायदा ” लागु करावा यासाठी बोरीवली बार असोसिएशनचे Adv. श्री. अमर घोसाळे यांना पाठिंबा…

0
Spread the love

संपादिका – दिप्ती भोगल

मुंबई:-दिनांक ६ जानेवारी २०२४ रोजी Adv. श्री. अमर घोसाळे यांनी बोरीवली Adv. बार असोसिएशनला त्यांना बीड जिल्ह्य़ातील श्री. क्षेत्र मच्छींद्रनाथ मंदिरात विना कारण प्रवेश व दर्शन घेण्यात नाकारून त्यांना , त्यांच्या आईला व सहकारी यांना मोबाईल वर शूटींग करत असताना मोबाईल फोडला व मारहाण झाली होती.
याबाबत त्यांनी रीतसर तक्रार जवळील पोलीस ठाण्यात फोन करुन केली होती. तसेच बीड जिल्ह्य़ाचे पोलीस अधीक्षक यांना ईमेल देखील केला होता . परंतु त्यांना कोणत्या प्रकारचा न्याय आजपर्यंत मिळालेला नाही.

याबाबत त्यांनी जनतेला न्याय मिळवून देणाऱ्या एखादया वकिलाला देखील अशी देवदर्शनाला प्रवेश बंदी व मारहाण होत असेल तर एखादया सामान्य त्रस्त नागरिकाला दर्शन व प्रवेश कसा मिळत असेल ? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

     असा अन्याय सहन होत नसल्यामुळे त्यांनी याबाबत जसे राजस्थान राज्यात  "Adv. संरक्षण कायदा २०२३" लागु करण्यात आला आहे तसाच कायदा महाराष्ट्रातही लागु करावा असे निवेदन बोरीवली Adv.बार असोसिएशनचे अध्यक्ष व सेक्रेटरी यांना दिले.

    बोरीवली Adv. बार असोसिएशनने तात्काळ या अर्जाची दखल घेत Adv. श्री. अमर घोसाळे यांना लेखी पाठिंबा देऊन पुढील वाटचालीस सहकार्य करण्याचे आश्वासन दिनांक  १६ जानेवारी २०२४ रोजी दिले.

 यानंतर Adv.श्री अमर घोसाळे लवकरच " Adv संरक्षण कायदा" राजस्थान प्रमाणे महाराष्ट्रातही लागु करावा असे निवेदन घेऊन  महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री.एकनाथजी शिंदे यांची भेट घेणार  असल्याचे सुरक्षा पोलीस टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट