आजपर्यंत २३ वकिलांवर झालेल्या हल्ला संरक्षणार्थ बोरीवली बार असोसिएशनकडुन पुकारण्यात आलेल्या बंदला उत्स्फुर्त प्रतिसाद..

संपादिका- दिप्ती भोगल
बोरीवली :– मागील वर्षभरात महाराष्ट्रातील वकिलांवर एवढे हल्ले झालेत त्याबाबत सरकारने आजपर्यंत काय केले ? कुठल्या संदर्भात सरकारने काय कारवाई केली ? आणि वर्षाच्या सुरूवातीला वकील पती पत्नींची निर्घृन हत्या करण्यात आली. सरकार काय करत आहे ? सरकार कोणासाठी आहे ? कशासाठी आहे ? याला जबाबदार कोण ? हेही सरकारने वकिलांसमोर ठेवले पाहिजे.
किती सहन करायचे ? इतरांना न्याय मिळवून देणारा जर अन्यायाचा बळी होणार असेल तर काय ?
अहमदनगरं जिल्हयातील राहुरी येथील न्यायालयात वकिली व्यवसाय करणारे अॅड. श्री. राजाराम आढाव आणि त्यांची पत्नी अॅड. सौ. मनिषा आढाव, दोघेही राहणार: मानोरी तालुका, राहुरी, जिल्हा: अहमदनगर या वकिल दांम्पत्यांचे अपहरण करून हत्या करण्यात आली आहे.

वकिल बंधू भगिनींनो, आपल्या राज्यात सध्या वकील बांधवांवर मोठया प्रमाणात अत्याचार, अन्याय आणि प्राणघातक हल्ले होत आहेत. परंतु आपण सर्वजण शांत आहोत.आपण जर अशाच प्रकारे शांत राहिलो तर उद्या आपल्यावरही असेच हल्ले होण्याचे नाकारता येणार नाही. किती दिवस आपण शांत राहणार आहोत ? अजून किती वकील बांधवांवर हल्ले होण्याची प्रतिक्षा आपण करणार आहोत ?

महाराष्ट्रातील वकिलांवर वारंवार झालेल्या हल्ल्यांपैकी काही घटना..
१ ) किल्ला कोर्ट मुंबई या ठिकाणी अॅड. अमित मिश्रा यांच्यावर आरोपींच्या भावाने धारदार शस्त्राने हल्ला केला होता.
२) चाळीसगाव येथील न्यायालयातील वकिल एस.टी.खैरनार यांच्यावर चाळीसगाव वकिल रूमच्या बाहेर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला गेला.
३) मालेगाव जिल्ह्या वाशीम येथील वकील सुदर्शन गायकवाड तसेच त्याची पत्नी आणि मुलगा यांना पोलीसांकडून अमानुष मारहाण.
४) शहादा येथे पोलीसाने सरकारी वकील बागुल याना पोलीस स्टेशनच्या आवारात जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण केली.
५) नाशिक येथे महिला वकील अलका मोरे यांच्यावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला.
६) कल्याण मध्ये महिला वकिल पुजा कांबळे यांना बदलापूर पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकाऱ्याकडून अपमानास्पद वागणूक त्यातून महिला वकिलाने आत्महत्या केलेचा प्रयत्न.
७) वर्धा येथील न्यायालयातच न्यायाधिशांसमोर महिला अॅड योगिता मून यांच्यावर आरोपीने चाकूने केलेला हल्ला.
८) नाशिक तलाठी कार्यालयात केलेल्या महिला वकिल यांना तेथील अधिकाऱ्याकडून असभ्य वर्तणूक आणि अपशब्द बोलून अपमानित केले गेले .
९) सांगोला येथे कोर्ट हॉलमध्ये न्यायालयीन कामकाज सुरू असतानाच वकिल सरगर यांना आरोपीकडून बेदम मारहाण.
१० ) उस्मानाबाद न्यायालयातून बाहेर पडत असतानाच वकिल प्रथमेश मोहिते यांच्यावर आरोपीकडून प्राणघातक हल्ला.
११) पुणे काळेवाडी येथील अॅड. शिवशंकर शिंदे यांचे अपहरण करून नांदेड तेलंगणाच्या हद्दीत अर्धवट जाळलेला मृतदेह मिळाला.
१२) अॅड. नितिन सातपुते यांच्यावर आरोपीने गाडी अडवून रस्त्यात शिविगाळ आणि मारहाण.
१३) सातारा येथील अॅड. राममोहन खारकर यांच्यावर रात्री शाहूनगर चौकात आरोपीकडून प्राणघातक हल्ला.
१४) बारामती वकील संघटनेचे अॅड. सुहास क्षिरसागर यांना पोलीस स्टेशनचे अधिकारी डी.वाय.एस.पी. यांच्याकडून मारहाण आणि खोटया गुन्हयात अटक.
१५) पुणे येथील महिला ॲड. याची पुणे ग्रामीण डी. वाय. एस. पी.
कडून विनयभंग कारवाई नाही म्हणून मंत्रालयामध्ये आत्महत्येचा प्रयत्न.
१६) विक्रोळी पोलीस स्टेशनमध्ये अॅड. अनिकेत यादव यांना पोलीसांकडून मारहाण आणि बेकायदेशीर डांबून खोटया गुन्हयात अडकवण्याची धमकी.
१७) अकोट येथे अॅड. अब्दुल जुन्नेद यांना पोलीस स्टेशनमध्ये पोलीसांकडून मारहाण.
१८) कल्याण सत्र न्यायालयात सरकारी वकिलावर आरोपीकडून न्यायालयीन कामकाज सुरू असतांना आरोपीकडून हल्ला.
१९) ॲड. सत्यदेव जोशी यांच्यावर भरदिवसा तलवारींचा दहिसर येथे हल्ला.
२०) बोरीवली येथील अॅड. पृथ्वीराज झाला याच्यावर कांदिवली पोलीस स्टेशनमध्ये ए.पी.आय. हेमंत गीते यांची क्रूरपणे मारहाण.
२१) नाशिक रोड कौटुंबिक न्यायालयाच्या आवारात ॲड. संतोष मंचरे यांच्यावर महिला पोलीसांकडून जीवघेणा हल्ला.
२२) वकिल अमर घोसाळे हे बिड जिल्ह्यातील श्री. क्षेत्र मच्छींद्रनाथ देवस्थान येथे दर्शनासाठी गेले असता त्यांना प्रवेश नाकारून मारहाण करण्यात आली.
२३ ) वकिल श्री. प्रविण डोंगरदिवे यांना कांदिवली येथे अपहरण करून बांधुन मारहाण करण्यात आली.
असे जवळ जवळ २३ वकिलांवर हल्ले झालेत आणि अजूनही कितीतरी हल्ले
वकिलांवर झाले आहेत.
अजून किती हल्ले होतील माहित नाही. आणि अजून किती पोलीस अधिकाऱ्यांकडून वकिलांना मारहाण होईल हे सांगता येत नाही.
अशाप्रकारे वकिल बांधवांवर प्राणघातक हल्ले पक्षकाराकडून होणार असतील, पोलीस अथवा पोलीस अधिकाऱ्यांकडून मारहाण होत असेल तर भविष्यात व्यवसायात तरूण / युवक येतील का ? हा प्रश्न पडतो.
याबाबत राज्यातील सर्व तालुका, जिल्हा वकिल संघटनांनी याबाबत तातडीची पाऊले उचलणे अत्यावश्यक आहे. वकिल संघटना या कुचकामी, निष्क्रीय नाहीत हे आपण दाखवून दिले पाहिजे.
इतरांना न्याय मिळवून देणाऱ्याची जर अशी अवस्था असेल तर बाकी लोकांचे काय ? प्रत्येक वकील बांधवाने याविरूध्द आवाज उठवला पाहिजे अन्यथा आज जे सुपात आहेत ते उद्या जात्यात कधी जातील हे सांगता येणार नाही.
आणि पक्षकारांनाही नम्रपणे सांगावयाचे वाटते की, बचाव पक्षाचे वकील अथवा सरकारी वकील हे आपापल्या पक्षकारांची बाजू मांडण्याचे काम करत असतात. ते तुमचे शत्रू किंवा वैरी नाहीत, दुश्मन नाहीत त्यामुळे अशाप्रकारचे प्राणघातक हल्ले करणे चुकीचे आहे.
आणि राज्यातील सर्व पोलीस बांधव, कर्मचारी अधिकारी यांनाही नम्रपणे विनंती करावीशी वाटते की, न्यायालयीन कामकाजामध्ये पोलीस आणि वकिल या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. त्यामुळे पोलीस स्टेशनमध्ये जर एखादा वकिल बांधव/भगिनी आलाच तर त्याला सन्मानाची वागणूक म्हणजे त्याला पुष्पगुच्छ, हारतुरे दया असे नव्हे. मात्र घालून पाडून बोलून अपमानीत करू नये एवढी साधी माफक अपेक्षा वकिलांची असते.
बार कॉन्सिलने अशाप्रकारे वकीलांवर अन्याय, हत्या, अत्याचार, प्राणघातक हल्ल्यांना प्रतिबंध करण्यासाठी ॲडव्होकेट प्रोटेक्शन बिल मंजूर होईपर्यंत आपण संघर्ष चालू ठेवला पाहिजे, ते गरजेचे आणि अत्यावश्यक आहे. जेणेकरून भविष्यात अशाप्रकारचे हल्ले वकिल बांधवांवर होणारच नाहीत याबाबत कठोर पावले उचलण्याची गरज आहे.
सदरचे प्रकार अतिशय निंदनीय असून या घटनेचा बोरीवली वकिल बार असोसिएशनकडुन निषेध करण्यात आला.
वकिल संरक्षण कायदा (Advocate Protection
Act) तात्काळ अमलात आणलाच पाहिजे. अशी विनंती आता
अँड. सतिश नामदेव नाईक
(माजी कमिटी मेंबर)
बोरीवली वकिल बार असोसिएशन, बोरीवली यांच्याकडून देखील करण्यात आली आहे.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com