बोरगांव मधील सराईत गुन्हेगार गणेश कारंडे रा. अतित ता. जि. सातारा यास एका वर्षाकरीता सातारा जिल्हयातून हद्दपार..

उपसंपादक – रणजित मस्के
सातारा :-सातारा जिल्हयामध्ये बोरगांव पोलीस ठाणे हद्दीत शरिराविरुध्दचे तसेच मालमतेविरुध्दचे गुन्हे करणारा सराईत गुन्हेगार गणेश गुलाब कारंडे रा. अतित ता.जि. सातारा यांचेवर सातारा जिल्हयामध्ये जबरी चोरी, जुगार, दंगा मारामारी, विनयभंग अशा प्रकारचे गुन्हे दाखल असल्याने बोरगांव पोलीस ठाणेचे प्रभारी अधिकारी सहा. पोलीस निरीक्षक आर. जी. तेलतुंबडे यांनी सदर सराईत गुन्हेगाराविरुध्द महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५६ प्रमाणे सातारा जिल्हयातून तडीपार करणेबाबतचा प्रस्ताव अपर पोलीस अधीक्षक सो. सातारा यांचे मार्फतीने उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी सातारा उपविभाग सातारा यांचेकडे सादर केलेला होता. सदर प्रस्तावाची चौकशी किरणकुमार सुर्यवंशी उपविभागीय पोलीस अधिकारी सातारा शहर विभाग यांनी केली होती.
यातील साराईत गुन्हेगाराकडुन सातारा जिल्हयातील सर्वसामान्य लोकांचे शरिराविरुध्द तसेच मालमत्तेचे नुकसान करुन गुन्हे करीत होती. त्याचवर दाखल असले गुन्हयांमध्ये त्यास अटक व कायदेशिर कारवाई करुनही तो जामीनावर बाहेर आल्यानंतर त्याचेवर वेळोवेळी करण्यात आलेल्या प्रतिबंधक कारवाईचा कोणताही परिणाम त्याचेवर झाला नाही अगर त्याचे गुन्हेगारी कृत्यांमध्ये सुधारणा झाली नाही. तसेच त्याचेवर कायदयाचा कोणताच धाक न
राहील्याने अशा गुन्हेगारांवर सर्वसामन्य जनतेमधुन कडक कारवाई करणेची मागणी होत होती.
वरील सराईत गुन्हेगारास श्री. सुधाकर भोसले उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी मातारा उपविभाग सातारा यांचे समोर सुनावणी होवुन त्यांनी महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५६ अन्वये सातारा जिल्हयातुन एका पर्याकरीता हद्दपारीचा आदेश पारीत केला आहे.

नोव्हेंबर २०२२ पासुन १२ उपद्रवी टोळ्यांमधील ३५ इसमांना तडीपार करण्यात आले आहे. तसेच सातारा जिल्ह्यातील ०८ सराईत गुन्हेगारांना तडीपार करणेत आलेले आहे. भविष्यातही सातारा जिल्हयामधील सराईत गुन्हेगारांचेविरुध्द हद्दपारी, मोक्का, एमपीडीए अशा प्रकारच्या कडक कारवाया करण्यात येणार आहेत.
या कामी हद्दपार प्राधिकरणापुढे सरकार पक्षाच्या वतीने अपर पोलीस अधीक्षक सातारा, श्रीमती आँचल दलाल यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे श्री अरुण देवकर, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, सातारा, सहा. पोलीस निरीक्षक आर. जी. तेलतुंबडे, पो. हा अमित सपकाळ स्थानिक गुन्हे शाखा सातारा, किरण निकम, दादा स्वामी, प्रशांत चव्हाण चोरगांव पोलीस ठाणे यांनी योग्य पुरावा सादर केला आहे.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com