बोरगाव पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण शाखेने 24 तासात घरफोडीचा गुन्हा केला उघड..

0
Spread the love

उपसंपादक – रणजित मस्के

सातारा :-श्री समीर शेख पोलीस अधिक्षक सो सातारा व श्रीमती आंचल दलाल, अप्पर अधिक्षक सातारा यांनी घरफोडीचे गुन्हे उघड करण्याच्या सुचना श्री राजीव नवले उपविभागीय पोलीस अधिकारी सातारा विभाग सातारा व श्री रविंद्र तेलतुंबडे सहाय्यक पोलीस निरीक्षक बोरगाव पोलीस ठाणे यांना दिल्या होत्या त्याअनुशंगाने श्री रविंद्र तेलतुंबडे सहाय्यक पोलीस निरीक्षक बोरगाव पोलीस ठाणे यांनी बोरगाव गुन्हे प्रकटीकरण शाखा यांना घरफोडीचे गुन्हे उघड करणेबाबतच्या सुचना दिल्या होत्या.

बोरगाव पोलीस ठाणे गु.र.नं. 227/2024 भा.द.वि. सं कलम 380,411,34 प्रमाणे दिनांक- 02/05/2024 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुनह्यातील फिर्यादी यांची मौजे माजगाव ता.जि. सातारा येथुन राहते घरातुन लोखंडी कपाट चावीने उघडुन पर्स मधील सोन्याचा गंठण काळे मन्यासह असलेला 49.780 मिली ग्रॅम (4) तोळे 9.780 मिली ग्रॅम) वजनाचे असलेला सोन्याचे गंठण कोणीतरी अज्ञात चोरट्याने मुहाम, लबाडीने, संमतीशिवाय चोरुन नेला असल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती.

सदर गुन्ह्याचे अनुशंगाने सपोनि तेलतुंबडे यांनी स्वतः गुन्हे प्रकटीकरण शाखेतील पोलीस अंमलदार यांना गुन्हा उघडकीस आणणेबाबत योग्य त्या सुचना दिलेल्या होत्या त्याप्रमाणे डीबी पथकाने मौजे माजगाव ता.जि.सातारा येथे जावुन तक्रारदार यांचे घरी तसेच आजु बाजुस चौकशी केली त्यानंतर एका विधीसंघर्ष बालकाकडे कौशल्यपुर्ण चौकशी केली असता त्याने सदरचे सोन्याचे गंठण चोरी करुन गावातील ओळखीचे बाळासो बाबुराव बर्गे वय-50 वर्षे रा-माजगाव ता. जि. सातारा याचेकडे दिले असल्याचे सांगितले. त्यानंतर डीबी पथकाने सदर इसमास अटक करुन त्याचेकडे चोरीस गेले सोन्याचे गंठणबाबत विचारणा करुन सदर गुन्ह्यात चोरीस गेलेले सोन्याचे गंठण 49.780 मिली ग्रॅम (4 तोळे).

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट