बोरंगाव पोलीसांनी एकाच दिवशी गांजाच्या २ स्वतंत्र कारवाया करुन ६ किलो ३५० ग्रॅम वजनाचा एकूण १,५६, ५००/- रुपये किंमतीचा मुद्येमाल केला जप्त….

उपसंपादक – रणजित मस्के
सातारा :- पोलीस अधीक्षक श्री समीर शेख तसेच अपर पोलीस अधीक्षक श्रीमती आंचल दलाल यांनी सातारा जिल्हयातील अवैध व्यवसायांवर प्रभावी व कठोर कारवाया करणेबाबत जिल्हयातील सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना सुचना दिल्या होत्या.
बोरगांव पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सपोनि श्री रविद्र तेलतुंबडे यांना त्यांच्या खास बातमीदारामार्फत मौजे कुसवडे ता जि सातारा गांवी गांजाची झाडे लावल्याबाबत तर नागठाणे गांवी गांजाची विक्री होत असलेबाबत बातमी मिळाली. त्याप्रमाणे श्री तेलतुंबडे यांनी अधिनस्त अधिकारी व अंमलदार यांच्याकरवी दिनांक २८/१० / २०२३ रोजी बोरगांव पोलीस ठाणे हद्दीच एकाच दिवशी २ स्वतंत्र कारवाया केल्या आहेत.

यापैकी पहिल्या कारवाईमध्ये अशोक पांडुरंग पवार, रा. कुसवडे, ता जि सातारा याने मौजे कुसवडे ता जि सातारा गांवी त्याच्या राहत्या घराजवळ गांजाच्या झाडांची लागवड केली असलेबाबत मिळालेल्या माहिती अनुषंगाने केलेल्या कारवाईमध्ये ५ किलो १३० ग्रॅम वजनाचा व एकुण १,२८,५०० रुपये किंमतीच्या गांजासद्रश्य वनस्पती जप्त केल्या आहेत.


तर दुसऱ्या कारवाईमध्ये अमोल आण्णा मोहिते हा नागठाणे गांवात त्यांच्या घराजवळ गांजाची विक्री करीत असल्याबाबत मिळालेल्या बातमी अनुषंगाने सदर ठिकाणी केलेल्या छापा कारवाईमध्ये अमोल मोहिते याच्याकडून १ किलो १२० ग्रॅम वजन व एकुण २८,००० /- रुपये किंमतीचा गांजा जप्त केला आहे. याप्रमाणे एकत्रीत ६ किलो ३५० ग्रॅम वजनाचा व एकुण १,५६, ५००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला असून याबाबत बोरगांव पोलीस ठाणेमध्ये २ स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पैकी एका गुन्हयाचा तपास मसपोनि डाळींबकर मॅडम तर दुसऱ्या गुन्हयाचा तपास पोऊनि श्री राजाराम
निकम हे करीत आहेत.

सदर कारवाई ही मा पोलीस अधीक्षक सो श्री समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक आंचल दलाल, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री किरणकुमार सुर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली बोरगांव पोलीस ठाणेचे सपोनि श्री रविद्र तेलतुंबडे, पोऊनि श्री राजाराम निकम, सहा पोलीस उप निरीक्षक श्री कारळे, पो हवा ६७ अमोल सपकाळ, पो हवा २२०२ दादा स्वामी, पो हवा २२३४ सुनिल कर्णे, पो ना २००६ दिपक मांडवे, पो ना ११६६ प्रशांत चव्हाण व म पो ना २०७१ नम्रता जाधव, पो कॉ १२२० संजय जाधव, पो कॉ २६०४ दादा माने इ पोलीस अधिकारी अंमलदार तसेच श्रीमती सुजाता पाटील, निवासी नायब तहसिलदार व फॉरेन्सीक युनिट, सातारा येथी पो हवा ५५५ मोहन नाचण, पो हवा ८२ रुद्रायण राऊत, पो कॉ ३७८ अमोल निकम व नाकोटीक डॉग युनिट पथकाचे पोऊनि श्री धनावडे, डॉग हॅन्डलर पो कॉ २३९१ दत्तात्रय चव्हाण व आंमली पदार्थ शोधक श्वान सुचक हे सहभागी झाले होते.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com