बोरगाव पोलीसांची धडाकेबाज कारवाई महाराष्ट्रात बंदी असलेला गुटखा, हिरा पान मसाला, राॅयल तंबाखु (गुटखा) वगैरे असा एकुण 25,00,000/- रुपयेचा माल जप्त…

उपसंपादक – रणजित मस्के
सातारा :- श्री समीर शेख पोलीस अधिक्षक सो सातारा व श्रीमती आंचल दलाल, अप्पर अधिक्षक सातारा यांनी महाराष्ट्रात विक्रीस बंदी असलेल्या गुटख्यावर कारवाई करण्याच्या सुचना श्री किरणकुमार सुर्यवंशी उपविभागीय पोलीस अधिकारी सातारा विभाग सातारा तसेच श्री रविंद्र तेलतुंबडे सहाय्यक पोलीस निरीक्षक बोरगाव पोलीस ठाणे यांना सुचना देण्यात आल्या होत्या त्या अनुषंगाने श्री रविंद्र तेलतुंबडे सहाय्यक पोलीस निरीक्षक बोरगाव पोलीस ठाणे यांनी बोरगाव गुन्हे प्रकटीकरण शाखा यांना कारवाईबाबतच्या सुचना दिल्या होत्या.

दिनांक 30/12/2023 रोजी श्री रविंद्र तेलतुंबडे सहा. पोलीस निरीक्षक बोरगाव पोलीस यांना गोपनीय बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, कराड ते सातारा जाणारे हायवेलेनने गुटख्याची वाहतुक करणारी गाडी जाणार आहे अशी माहिती मिळाल्याने श्री रविंद्र तेलतुंबडे सहा. पोलीस निरीक्षक तसेच गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अंमलदार हे बोरगाव पोलीस ठाणेचे हद्दीमध्ये काशीळ ते नागठाणे हायवे रोडने पेट्रोलिंग करीत असताना मौजे अतीत गावच्या हद्दीतील कराड ते सातारा जाणारे हायवे लेनवर वाढेकर पेढेवाले यांचे दुकानाजवळ आले असता तेथे अशोक लेलंड कंपनीचे बडा दोस्त वाहन क्रमांक MH09-GT-1355 हे संशयित वाटलेने त्यास थांबवुन त्यावरील चालकाकडे विचारपुस केली असता तो उडवाउडवीची उत्तरे देवु लागला म्हणून गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अंमलदार यांनी सदर वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये हिरा पान मसाला रॉयल 717 टोबैको गुटखा व वाहन असा एकूण 25,00,000/- रुपये किंमतीचा प्रतिबंधीत माल (गुटखा) तसेच वाहन ताब्यात घेतलेले आहे.
सदर बाबत अपर्णा भोईटे सहाय्यक आयुक्त सातारा अन्न सुरक्षा विभाग अधिकारी तसेच अन्न सुरक्षा विभाग अधिकारी श्रीमती वंदना विठ्ठलराव रुपनवर, श्री इम्रान समीर हवलदार, श्रीमती प्रियांका नामदेव वाईकर यांना कळविल्या नंतर त्यांनी समक्ष हजर होवुन ताब्यात घेतलेला मुद्देमाल जप्त केला असुन त्याबाबत बोरगाव पोलीस ठाणे गु.र.नं. 599/2023 अन्न सुरक्षा आणि मानके
अधिनियम 2006 चे कलम 26(2) (i), 26(2)(iv), 27(3)(e), 30(2)(a),3, 59,
भा.द.वि.सं.188,272,273,328,34 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे.
श्री समीर शेख पोलीस अधिक्षक सो सातारा व श्रीमती आंचल दलाल, अप्पर अधिक्षक सातारा, श्री किरणकुमार सुर्यवंशी उपविभागीय पोलीस अधिकारी सातारा यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली श्री रविंद्र तेलतुंबडे सहाय्यक पोलीस निरीक्षक गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोहवा दादा स्वामी, पोलीस नाईक प्रशांत चव्हाण, दिपककुमार मांडवे, पोकों केतन जाधव, पोहवा अमोल सपकाळ, पोकों विशाल जाधव चालक पोना उत्तम कदम, यांनी सदरची कारवाई केलेली आहे.
आरोपी नावे –
1) बाबासो बंडा मडके वय-36 रा-महावीर चौक रुई जि. कोल्हापुर.
2) दिपक कल्लापा अबदान वय-42 वर्षे रा-महावीर चौक रुई जि. कोल्हापुर.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com