बोईसर पोलीसांनी बंद बाॅमबे रेऑन कंपनीत अज्ञात चोरटयानी टेक्स्टाईल मशीन मधील १ ,७६,०२२७८ /- रुपयाचा मुद्देमाल चोरणाऱ्याना ठोकल्या बेड्या ..

प्रतिनिधी-मंगेश उईके
पालघर:-दिनांक २७/१०/२०२३ रोजी बोईसर पोलीस ठाणे येथे फिर्यादी कृष्णकुमार नरसिंहलाल अग्रवाल वय ६९ वर्षे, रा. ई/२१, इंद्रप्रस्थ, सर्वोदयनगर, जैन मंदिर रोड, मुलुंड पश्चिम यांनी फिर्याद दिली होती की, तारापुर-बोईसर एम आय डी सी प्लॉट क्र. जी/९५ बोईसर येथील बॉम्बे रेऑन या बंद कंपनीमधील दि.०७/०६/२०२२ ते दि.२८/०४/२०२३ रोजीचे दरम्याण कोणीतरी अज्ञात चोरटे यांनी कंपनीत प्रवेश करून कंपनीतील टेक्सटाईल मशीन मधील एकूण ४९९ इलेक्ट्रीक बोर्ड व सर्कीट्स असे एकूण १,७६,०२२७८/- रूपये किंमतीचा मुद्देमाल चोरी केला आहे.
बाबत फिर्याद दिल्याने बोईसर पोलीस ठाणे येथे गु.र.नं. ४७२/२०२३ भा.द.वि.सं. कलम ३८०, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन श्री. बाळासाहेब पाटील, पोलीस अधीक्षक, पालघर, श्री. पंकज शिरसाट, अपर पोलीस अधीक्षक, पालघर यांचे मार्गदर्शनाखाली श्री. अनिल विभुते, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, पालघर यांना तपास करण्याबाबत सुचना दिल्या. त्याअनुषंगाने पोउपनि/स्वप्नील सावंतदेसाई यांचे पथक तयार करण्यात आले. सदर पथकास नमुद गुन्ह्यातील अज्ञात आरोपी यांचा शोध घेत असताना गोपणीय बातमी मिळाली की, आरोपी मोहम्मद हुसेन कर महुसेन चौधरी हा टेक्सटाईल मशीन मधील इलेक्ट्रीक कार्ड विक्री करण्यासाठी रोनक ढाबा, यशवंत सृष्टी, बोईसर येथे येणार आहे अशी खात्रीशिर माहिती मिळाली.
मिळालेल्या माहितीच्या आधारे सापळा रचून सदर आरोपीस ताब्यात घेतले. नमुद आरोपीकडे कसून चौकशी केली असता सदरचा गुन्हा त्याने त्याचे साथीदार
१) मोहम्मद सिराज,
२) सुर्यमणी,
३) मनिषकुमार,
४) राकेश,
५) बाबु प्रजापती,
६) लंबु उर्फ चिंतु,
७) बॉम्बे रेऑन कंपनीतील वॉचमैन नाव माहित नाही यांचेसह केल्याचे कबुल केले.
त्यानुसार वरील आरोपींचा बोईसर परीसरात शोध घेतला असता आरोपी
१) मोहम्मद हुसेन करमहुसेन चौधरी वय ४२रवर्षे रा. क्रिस्टल पार्क, सी विंग रूम नं.२०३ अवध नगर बोईसर ता. जि. पालघर मूळ. रा. ग्राम पिरैला नरहरिया ता. डुमरियागंज जि. सिद्धार्थ नगर राज्य उत्तर प्रदेश,
आरोपी क्रमांक
२) मोहम्मद सिराज मुक्तार अहमद मणियार वय ४३ वर्षे, सध्या रा. ऑचिड अर्पाटमेंट, सी विंग, रुम नं. १०५, अधिकारी हॉस्पीटल जवळ, मान बोईसर पुर्व, मुळ रा. ग्राम पो. चितडी पोस्ट माहुली ता. दानहरा जि. संतकबीरनगर, राज्य उत्तरप्रदेश.
३) सुर्यमणी रामशंकर गौतम वय ३६ वर्षे, सध्या रा. साईलोकनगर ठाकूर चाळ ,गणेशनगर बोईसर ता. जि. पालघर.
४) मनिषकुमार रामेश्वर सिंग वय ३२ वर्षे, सध्या रा. कृष्णा आर्केड बिल्डींग, बी विंग रुम नं. ३०६, यशवंतसृष्टी, बोईसर ता.जि. पालघर यांना अटक केले आहे.
सदर गुन्ह्याचा अधिक तपास हा पोउपनि/अहिरराव, नेमणुक बोईसर पोलीस ठाणे हे करीत आहेत.
सदरची कारवाई ही श्री. बाळासाहेब पाटील, पोलीस अधीक्षक, पालघर, श्री. पंकज शिरसाट, अपर पोलीस अधीक्षक, पालघर, श्री. विकास नाईक, उप विभागीय पोलीस अधिकारी, बोईसर विभाग यांचे मार्गदर्शनाखाली श्री. अनिल विभुते, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, पालघर, पोउपनि/स्वप्नील सावंतदेसाई, श्रेपोउपनि/सुनिल नलावडे, पोहवा/संदिप सुर्यवंशी, पोहवा/दिपक राऊत, पोहवा / नरेंद्र पाटील, पोहवा/ कैलाश पाटील, पोहवा/दिनेश गायकवाड, पोहवा/ नेमाडे, पोहवा/सरदार सर्व नेमणुक स्थानिक गुन्हे + पालघर तसेच पोना/बी. जी. वाघमारे, नेमणुक साथ… पोलीस ठाणे, पालघर यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com