बोईसर मध्ये आंबट गोड मैदानात एका ३६ वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या..

प्रतिनिधी-मनिष कांबळी
बोईसर:

दिनांक १५ मे २०२५ रोजी बोईसरः पास्थळ, MSEB वसाहती जवळील आंबट गोड मैदानात 36 वर्षीय तरुणाचा खून झाल्याची बातमी समोर आली आहे. अभिषेक राम सिंह असे मृताचे नाव आहे. घटनास्थळी उपस्थित असलेल् या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्याच्या डोक्यावर धारदार शस्त्राने वार करण्यात आले, त्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच बोईसर पोलिसांनी घटनास्थळ गाठून या प्रकरणाचा तपास सुरू केला. हत्येमागचे कारण अद्याप समोर आलेले नसून, काही जुन्या वैमनस्यातून किंवा आपसी वादातून ही हत्या झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
पोलीसांनी मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला असून एफआयआर नोंदवून अज्ञात आरोपींचा शोध सुरू केला आहे.