बोगस चिनी लोन अॅपचा वापर करुन ऑनलाईन फसवणुक करणारी टोळीचा भारतातील मास्टर माईंड बेंगलोर, कर्नाटक येथून सायबर पो स्टे जळगाव कडून गजाआड…

0
Spread the love

उपसंपादक – रणजित मस्के

जळगाव : सदर गुन्हयातील फिर्यादी हे पहुर, ता. जामनेर येथील रहिवाशी असुन त्यांनी दि. ०९/०७/२०२२ पासुन ते दि. २१/०९/२०२२ चे दरम्यान Pop Loan, Donaz Loan, Getacash Loan, Ram Loan, Certain Loan, Space Loan, Alpha Loan, Sivan Wallet Loan, Claues Loan XP Cash Loan, Firmament Loan, Amla Cerdit Loan, Duta Loan, Arden Cash Loan, Holi Loan, Doa Cash Loan Optional Credit] Loan, Support Loan, Creditbee Loan Eas Loan, CashG Loan, Cashfun Loan, Surf Loan, FF Loan, Axenandra Loan, Tracu Loan, Sintaura Loan, Fly Loan, Hadis Coin Loan, Get a Cash Loan, Cashwin Loan, Birdwish Wallat Loan R नावाचे ऑनलाईन लोन देणारे ३५ मोबाईल लोन अॅप्लीकेशन फिर्यादी यांना मोबाईल मध्ये इन्स्टॉल करण्यास सांगुन त्याद्वारे फिर्यादी यांचे मोबाईल मधील सर्व कॉन्टैक्ट लिस्ट, फोटो व इतर माहीती फिर्यादी यांचे मोबाईल मध्ये अनधिकृत रित्या प्रवेश करून चोरली आहे व फिर्यादी यांनी पैशांची मागणी केलेली नसतांनाही फिर्यादी यांना लोन स्वरुपात ६,०८,७८५/- रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये ऑनलाईन पाठविले होते. सदर लोनचे पैसे व्याजासह परत करण्याच्या नावाखाली जिवे ठार मारण्याची धमकी देवून जास्त पशांची मागणी करीत असत. सदर आरोपींनी फिर्यादी व त्यांचे मोबाईल मधील संपर्क यादीतील लोकांना फिर्यादी व त्यांच्या पत्नी बद्दल अश्लील व बदनामीकारक संदेश फिर्यादी व त्यांचे नातेवाईकांना व्हॉट्स अॅपवरती पाठविले आहे. फिर्यादी यांनी नातेवाईकांकडुन उसणवारीने पैसे घेवुन आरोपींचे मागणी प्रमाणे वारंवार पैसे भरले तरीही पुन्हा पुन्हा पैसे मागत त्यामुळे फिर्यादी हे पुर्णपणे खचले होते. समाजात त्यांची व कुटुंबाणी बदनामी झाली असल्याने त्यांचे मनात आत्महत्या करण्याचे विचार येत होते. अशावेळी त्यांनी सायबर पोलीस स्टेशन जळगांव येथे येवून त्यांचे सोबत झाले प्रकाराची हकीकत कथन केली असता सायबर पोलीस स्टेशन जळगांव येथे त्यांचे फिर्यादी वरुन भाग-५ गुरनं. ३० / २०२२ भादवि क.३८४, ३८५,३८६, ४२०, ४६९, ५००,५०१,५०४, ५०६, १२०(ब),३४ सह माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० चे कलम ६६ ६६(सी), ६६ (डि). ६७ प्रमाणे फिर्यादी यांना लोन स्वरुपात दिलेल्या ६.०८.७८५/- रुपयांवर व्याजरुपी खंडणीच्या स्वरुपात फिर्यादी यांचेकडुन अधिकचे ४,२३,७१९/- रुपये खंडणीच्या स्वरुपात स्विकारले आहे.

सदर गुन्हयाचे तपासात मा. पोलीस अधीक्षक, जळगाव, मा. अपर पोलीस अधीक्षक, जळगाव परिमंडळ यांचे मार्गदर्शनाखाली सायबर पो.स्टे. चे पोलीस निरीक्षक अशोक उत्तेकर यांनी व त्यांचे अधिनस्त सायबर पो.स्टे. चे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी तपासाचे अनुषंगाने फिर्यादी यांना आलेले कॉट्सअॅप मॅसेज, व्हॉट्सअॅप कॉल, फिर्यादी यांनी ज्या मोबाईल अॅप्लीकेशन मधुन लोन त्यांचे बँक खात्यामध्ये जमा झाले होते व फिर्यादी यांनी ज्या बँक खात्यामध्ये पैसे भरले आहे. अशा सर्व प्राप्त माहितीचे तांत्रिक विश्लेपन करुन आरोपी हे बेंगलोर, कर्नाटक व तामिळनाडु राज्यातील असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर मा. पोलीस अधीक्षक, जळगाव यांचे आदेशाने सदर गुन्हयातील आरोपी अटक करणेकामी व तपासकामी कर्नाटक राज्यातील बेंगलोर येथे पोउपनि दिगंबर थोरात यांचे सोबत पोहेकॉ प्रविण वाघ, पोहेकॉ / राजेश चौधरी, पोना दिलीप चिंचोले, मपोना दिप्ती अनफाट, पोकॉ दिपक सोनवणे, पोकों गौरव पाटील, पोकॉ अरविंद वानखेडे असे तपास पथक रवाना झाले होते.

सदर गुन्हयातील आरोपी १) प्रविण पिता गोविंदराज, वय-२८. पत्ता-८४/५ ५th क्रॉस, सेबॅस्टीन चर्च जवळ, अनापल्ली, अडगुडी, बेंगलुरु, कर्नाटका, २) सतिष पी, वय ३०, रा घर क्रं.११. २१ क्रॉसचे मागे, मेन रोड जवळ, ईजीपुरा, बेंगलुरु, कर्नाटक असे आरोपी अटक करुन त्यांचेकडुन फसवणुक रकमेपैकी
२,००,०००/- रुपये हस्तगत करण्यात आले होते. ते आजरोजी पोलीस उपअधिक्षक संदिप गावित यांचे हस्ते फिर्यादी यांना २,००,०००/- रुपये परत देण्यात आले आहे.

सदर गुन्हयाचे तांत्रिक कामकाज हे सायबर पो.स्टे. येथील पोउपनि दिगंबर थोरात, पोना दिलीप चिंचोले व पोका गौरव पाटील यांनी केले होते.

नागरीकांना जाहीर आवाहन

तरी याव्दारे सायबर पोलीस स्टेशन जळगाव कडून जिल्ह्यातील नागरीकांना आवाहन करण्यात येत आहे की, ऑनलाईन कर्ज घेतांना सदर अॅप विश्वास बँकांचे आहे अगर कसे याबाबत सविस्तर खात्री करावी ऑनलाईन लोन अॅप इन्स्टॉल करतांना आपले संपर्क (Contact) यादी, गॅलरी, टेक्स्ट मेसेज याची परवानगी देवु नये जेणेकरून फसवणुक होणार नाही. तसेच कुठल्याही अनोळखी व्यक्ती वा अॅपव्दारे ऑनलाईन व्यवहार करणे टाळावेत व ऑनलाईन व्यवहारांचे पासवर्ड नेहमी स्ट्रांग ठेवावेत, तसेच कोणी हि अनोळखी व्यक्तींना स्वताः चे नावे बँक खाते तयार करून देवू नये.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः

मोबा.नं. 9920601001

info@surakshapolicetimes.com

diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट