४ वेळा “भारत श्री “किताब मिळवणारे स्व. आशिष साखरकर यांच्या स्मरणार्थ “शरीर सौष्ठव स्पर्धेचे” आयोजन संपन्न..

संपादिका- दिप्ती भोगल
मुंबई:– ४ वेळा “भारत श्री” किताब मिळवणारे तसेच अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पदक व पुरस्कारांनी ख्यातनाम असणारे सुप्रसिद्ध शरीर सौष्ठव खेळाडू स्व. आशिष साखरकर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आयोजित “दक्षिण मुंबई श्री, शरीर सौष्ठव स्पर्धा'” मनसे मलबारहिल विधानसभा व मनसे शारीरिक सेनेचे कार्यसम्राट सरचिटणीस श्री संतान फर्नांडिस यांच्या संकल्पनेतून, मलबारहिल विभागध्यक्ष श्री निलेश शिरधनकर यांच्या सहकार्याने गिरगाव येथील “साहित्य संघ मंदिर, सभागृह” येथे आयोजित करण्यात आला होते.

















मुंबईतील असंख्य खेळाडूंनी या स्पर्धेत भाग घेतला सदर कार्यक्रमास मनसे नेते सन्मा. श्री बाळा नांदगावकर, शारीरिक सेनेचे अध्यक्ष श्री. ऋषी शेरेकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com