शरीराविरुध्दचे गंभीर गुन्हे करणा-या सराईत गुन्हेगारावर हडपसर पोलीसांकडुन एम.पी.डी.ए. कायदयान्वये केली कारवाई

सह संपादक रणजित मस्के
पुणे

यातील हडपसर पोलीस स्टेशनचे अभिलेखावरील गुन्हेगार राकेश देविदास थोरात वय-२२ वर्षे रा. जुन्या हापशा जवळ, ‘मांजराईनगर मांजरी पुणे यांचे विरूब्द यापूर्वी खुनाचा प्रयत्न करणे, गंभीर दुखापत करणे, बेकायदेशीर घातक शस्त्र जवळ बाळगणे, व इतर असे ०५ गंभीर गुन्हे दाखल असुन त्यास यापुर्वी ०२ वर्षे तडीपार केले होते त्याचे विरुध्दचे दाखल गुन्ह्यांमधून तो जामीनावर सुटले नंतर पुन्हा आपली गुन्हेगारी कृत्ये करीत होता त्यांचेवर गुन्हे दाखल आहेत ते खालील प्रमाणे-
राकेश देविदास थोरात वय-२२ वर्षे रा. जुन्या हापशाजवळ, मांजराई नगर मांजरी पुणे.
दाखल गुन्हे
१) ५१६/२०२१ आर्म अॅक्ट कलम ४ (२५) महा.
पोलीस अधिनियम कलम ३७ (१) सह १३५
२ ) १०९२/२०२१ भादवि. कलम-३०७,१४३,१४७,१४९, ३२३, ५०४,३४ आर्म अॅक्ट क ४ (२५) महा. पोलीस अधि. कलम ३७ (१) १३५ क्रि. लॉ. अ.अॅ.क ३ व ७
३) १३०८/२०२२ नादवि. कलम-१४३,१४७,१४८,१४९, ४२७, ५०४, आर्म अॅक्ट कलम ४ (२५) महा. पोलीस अधिनियम क३७ (१) (३) सह १३५ क्रि. लॉ.अ.अॅ. कलम ३ व ७
४) १४५५/२०२३ भादविक-३०७,३२४, ३२३,५०४,५०६,१४६, १४७,१४८,१४९, क्रिमिनिल लॉ
अमेंडमेंट अॅक्ट ७ महा. पोलीस अधिनियम कलम ३७ (१) (३) १३५, आर्म अॅक्ट कलम ४(२५) ५) १७८/२०२५ बिएनएस-३५२.३५१ (३), आर्म अॅक्टकलम ४(२५), क्रिमिनल लॉ अमेंडमेंट कलम ३ व ७, महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७ (१) (३) सह १३५ व १४२.
दाखल गुन्हयांचे तपासामध्ये यातील रेकॉर्डवरील गुन्हेगार याने वारंवार गंभीर गुन्हे करुन सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा पोहचवीत असुन तो समाजासाठी धोकादायक व्यक्ती असलेचे तपासामध्ये निदर्शनास आलेने आहे. त्याचे वरील गुन्हयांचा सखोल आढावा घेवुन त्याचे विरुध्द महाराष्ट्र झोपडपट्टी दादा, विघातक कृत्यांना आळा घालण्याबाबत कायदा सन (१९८१ सालचा महाराष्ट्र अधिनियम क्र. ५५) (सुधारणा १९९६) (सुधारणा २००९) सुधारणा २०१५ थे कलम ३ प्रमाणे ०१ वर्षे स्थानबध्द करणेबाबत प्रस्ताव पाठविला असता मा. पोलीस आयुक्त, सो पुणे शहर यांचे कडील आदेशान्वये ०१ वर्षे स्थानबध्द करुन मध्यवर्ती कारागृह, बुलढाणा येथे ठेवणेबाबत आदेश केले आहेत. त्यास ताब्यात घेवून बुलढाणा जेल येथे रवाना करण्यात आले आहे.
सदरची कामगिरी मा. अमितेश कुमार पोलीस आयुक्त पुणे शहर, मा. रंजनकुमार शर्मा साो. सह पोलीस आयुक्त साो. पुणे शहर, मा. मनोज पाटील, अपर पोलीस आयुक्त सौ. पुर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर, मा. राजकुमार शिंदे, पोलीस उप-आयुक्त साो. परीमंडळ-५ पुणे शहर, मा. अनुराधा उदमले, सहा. पोलीस आयुक्त, हडपसर विभाग पुणे शहर, त्यांचे मार्गर्शनाखाली मा. संजय मोगले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक हडपसर पोलीस स्टेशन पुणे शहर, मा. निलेश जगदाळे, पोलीस निरीक्षक (गुन्हे), पोलीस उप-निरीक्षक महेश कवळे, हडपसर पो.स्टे. निगराणी पथकातील सहा पोलीस फौजदार प्रविण शिंदे, पोलीस अंमलदार शरद चव्हाण, प्रशांत दुधाळ, मनिषा जरांडे, आश्लेषा माने यांनी कारवाई केली आहे.