अंधेरीत दैवज्ञ समाजाचा ८ वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात संपन्न..

मुख्य संपादिका – दिप्ती भोगल
मुंबई






रविवारी दिनांक ४ में २०२५ रोजी सायंकाळी ५ वाजता रंगमंचाची पुजा करुन व श्रीफळ वाढवून डॉ प्रविण पोतदार यांच्या हस्ते झाला. त्यानंतर डॉ. प्रविण पोतदार, डॉ. प्रशांत दांडेकर, जिवन कांदळगावकर, अध्यक्ष अशोक माहुलकर, महिला विभाग अध्यक्षा नीता कासेकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले. श्री गणेशाच्या प्रतिमेला सरचिटणीस अनिल कारेकर यांनी तसेच नामदार नाना शंकरशेट यांच्या प्रतिमेला उपाध्यक्षा ज्योती पोवळे यांनी पुष्पमाला अर्पण केली.
नंतर महिला नी ईशस्तवन सादर करून कार्यक्रमाची सुरुवात केली. महिला विभागाने सुंदर नृत्याचा नजराणा सादर करत उपस्थिताची मनें जिंकली. कु. आर्या धारगळकर हीने नृत्य सादर केले तसेच साक्षी पोवळे, श्रावणी पोवळे मायलेकी ने नृत्याचा नजराणा सादर केला.
मनोज मालंडकर, शिवदत्त मालंडकर, करण मालंडकर यांनी बहारदार गाणी गात रंगत आणली. कु. धैर्य पोवळे याने नृत्य सादर करून उपस्थितांचे मन जिंकले. सह सेक्रेटरी सुनिल वाडकर यांनी कवी कुसुमाग्रज यांच्या काही कविता सादर करून रंगत आणली.
सरचिटणीस अनिल कारेकर यांनी संस्थेचा मागील सर्व अहवाल सादर केला व आमचा १० वा वर्धापनदिन मोठ्या प्रमाणात साजरा करण्याचा संस्थेचा मानस आहे अशी ईच्छा व्यक्त केली. हा वर्धापन दिन संस्थेने नामदार नाना शंकरशेट यांच्या कार्याला समर्पित केला होता. त्यानिमित्ताने नानांच्या कार्याचे माहितीपूर्ण फलक प्रदर्शित केले होते. यावेळी मुंबई सेंट्रल स्थानकाचे नामांतर करून नाना शंकरशेट मुंबई टर्मिनस असे नामकरण करण्यासाठी प्रतिकात्मक मोर्चाचे सादरीकरण करून ज्ञाती बांधवांमध्ये जनजागृती चा प्रयत्न केला.
डॉ. प्रशांत दांडेकर यांचा सत्कार शाल व पुष्पगुच्छ देऊन डॉ. गजानन रत्नपारखी यांनी केला. प्रशांत दांडेकर यांनी आपल्या भाषणामध्ये नेहमी सकारात्मक विचार करा आणि बघा आपलं काम कसं होते, असे सुंदर मार्गदर्शन केले.
डॉ. प्रविण पोतदार यांचा सत्कार डॉ. गजानन रत्नपारखी यांनी शाल व पुष्पगुच्छ देऊन केला.
अंधेरी दैवज्ञ समाजाचे कार्य वाखाणण्याजोगे आहे, असे कौतुकास्पद मत डॉ. पोतदार यांनी व्यक्त केले.
दै स प चे विश्वस्त व अंधेरी दैवज्ञ समाजाचे सल्लागार रविंद्र माहिमकर ( रविमा )यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. रविमा आपल्या भाषणात म्हणाले की अंधेरी दैवज्ञ समाजाच्या स्थापने पासून मी सर्व कार्यक्रमात सहभागी होतो. कार्यकर्ते उत्साहाने काम करताना पाहून मन भारावून जाते.
मराठी राज्य भाषा निमित्ताने निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आलि होती त्याचा निकाल उपाध्यक्ष ज्योती पोवळे यांनी जाहीर केला विजेत्यांचे अभिनंदन केले व सहभाग घेतला त्या सर्वांचे आभार मानले. द्वितीय पारितोषिक विजेत्या संध्या चाचड यांनी आपल्या निबंधाचे वाचन केले आणि आपण मंत्रालयात काम करत असताना नाना शंकरशेट यांचे स्मारक आणि नाना शंकरशेट टर्मिनस नामांतर या साठी जे सहकार्य करता येईल ते करेन असा विश्वास दाखवला.
गोरेगावकर ज्वेलर्सचे पंकज गोरेगावकर यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.
दे,स,प सह सेक्रेटरी सुनिल देवरुखकर
दै,स,प सह खजिनदार सजिव वगळ
दै स प महाजनवाडीचे जीवन कांदळगावकर या सर्वांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला समाज सेवक जयेश बंदरकर, बोरीवली दैवज्ञ समाजाचे उपाध्यक्ष, वासुदेव नार्वेकर, पतपेढी चे शंकर नार्वेकर, प्रभाकर पोतदार, दिनेश पोतदार या सर्वांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
अंधेरी दैवज्ञ समाज्याकडूंन उत्कृष्ट कार्यकर्ता म्हणून राजेंद्र कारेकर यांचा सत्कार करण्यात आला.
श्री संजय कारेकर यांना अंधेरी दैवज्ञ उद्योगश्री या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
अंधेरी दैवज्ञ भूषण हा पुरस्कार संगीतकार गोविंदराव पोवळे यांना देवून सन्मानित करण्यात आले.
समाजश्रेष्ठी डॉ. गजानन रत्नपारखी सर यांचा सन्मान चिन्ह, शाल, पुष्पगुच्छ देऊन अध्यक्ष अशोक माहुलकर यांच्या हस्ते करण्यात आला.
डॉ. गजानन रत्नपारखी सर आपल्या भाषणात म्हणाले अंधेरी दैवज्ञ समाजाचे पदाधिकारी पदासाठी नाही तर समाज कार्यासाठी नेहमी तत्पर असतात. आपल्या दिलखुलास भाषणाने सर्व उपस्थितीताची मनें जिंकली.
अध्यक्षीय भाषणात अशोक माहुलकर यांनी सांगितले की कोणत्याही कार्यक्रमात आधी गणरायाला वंदन करून सुरुवात करतो तसेच आम्ही कार्यक्रमाच्या आधी गजानन रत्नपारखी यांच्या भेटीने घेऊन करतं असतो.
डॉक्टर संस्थेच्या सुरवातीपासून आमच्या बरोबर आहेत व पुढेही राहतील.
आपल्या लज्जतदार वाणीने त्यांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. खजिनदार विकास मसुरकर यांनी शिस्तबद्ध आणि छान सूत्रसंचालन केले. या कार्यक्रमाला २१३ ज्ञाती बांधवांची उपस्थिती होती.
महीला विभाग सेक्रेटरी आरती मसुरकर यांनी उपस्थितांचे आभार मानले त्यानंतर स्नेहभोजन होऊन कार्यक्रमाची सांगता झाली