छत्रपती संभाजी महाराजांबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचा भाजपा तर्फे जाहीर निषेध…
प्रतिनिधी-रेश्मा माने
महाड: भारतीय जनता पार्टी पंचायत राज, ग्रामविकास विभाग, किसान मोर्चाच्या वतीने महाड येथे आज जाहीर निषेध आंदोलन करण्यात आले.
विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराजांबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचा भारतीय जनता पार्टी पंचायत राज,ग्रामविकास विभाग,किसान मोर्चाच्या वतीने महाड येथे जाहीर निषेध करण्यात आला.
यावेळी अजित पवार यांच्या फोटोला जोडे मारून त्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली .
महाड मधील छत्रपती शिवाजी महाराज चौकात झालेल्या या निषेध आंदोलनात बीजेपीचे विभागातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com