भाजप खासदार मा.श्री. मनोज कोटक यांच्या निधीतून भांडूप,विक्रोळी, घाटकोपर (प.) क्षेत्रात विविध कामाचे भूमिपूजन संपन्न…!

शनिवार दिनांक २२ जानेवारी २०२२ रोजी मा.खासदार मनोज कोटक यांच्या निधीतून भांडुप, विक्रोळी, घाटकोपर (पश्चिम) विधानसभा क्षेत्रातील विविध कामांचे भूमीपूजन असंख्य भाजप कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत संपन्न झाले.
प्रतिनधी- सायली मळेकर
भांडुप विधानसभा क्षेत्रात सकाळी 10 च्या सुमारास श्री. साईकृपा वेल्फेअर सोसायटी, डकलाईन रोड, खिंडीपाडा, भांडुप (प) येथे संरक्षण भिंत बांधण्याच्या कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.

याप्रसंगी भाजप भांडूप विधानसभा अध्यक्ष प्रवीण दहितुले,आर. डी. यादव,भाजप कार्यकर्ते, पदाधिकारी आणि स्थानिक रहिवासी उपस्थित होते.
सकाळी 10:30 च्या सुमारास भंडारी समाज विकास मंडळ, राम नगर, रावते कंपाऊंड, भांडुप (प) येथे नागरी सुविधा कामाचे भूमिपूजन करण्यात आले.

याप्रसंगी भाजप भांडूप विधानसभा अध्यक्ष प्रवीण दहितुले ,गुरुनाथ मिठबावकर, हेमंत जाधव,दीपक दळवी, संजय शर्मा, गणेश जाधव, भाजप कार्यकर्ते,पदाधिकारी आणि स्थानिक रहिवाशी उपस्थित होते.

त्यानंतर विक्रोळी विधानसभा क्षेत्रात संध्याकाळी 4 च्या सुमारास श्री ओंकारेश्वर सेवा मंडळ, दातार कॉलनी, भांडुप (पूर्व) येथील नागरी सुविधा कामाचे भूमिपूजन करण्यात आले.
याप्रसंगी नगरसेविका सारिका पवार, विक्रोळी विधानसभा अध्यक्ष मंगेश पवार, विश्वास घाग, रजनी कदम, भाजप कार्यकर्ते, पदाधिकारी आणि स्थानिक रहिवासी उपस्थित होते.
संध्याकाळी 4.30 च्या सुमारास बुध्दांकुर मित्र मंडळ, टागोर नगर, ग्रुप नं.3, विक्रोळी (पूर्व) येथील नागरी सुविधा कामाचे भूमिपूजन करण्यात आले.
त्यानंतर घाटकोपर (पश्चिम) विधानसभा क्षेत्रात संध्याकाळी 5.00 च्या सुमारास सिध्दार्थ नगर (विक्रोळी), एस. आर. ए. सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित, कैलास कॉम्पलेक्स समोर, पार्कसाईट, विक्रोळी (प) येथील नागरी सुविधा कामाचे भूमिपूजन करण्यात आले.
याप्रसंगी ईशान्य मुंबई जिल्हा अध्यक्ष अशोक राय, घाटकोपर पश्चिम मंडळ अध्यक्ष अनिल निर्मळे, घाटकोपर पूर्व मंडळ अध्यक्ष रवी पुंज, मुंबई उत्तर भारतीय मोर्चा अध्यक्ष जयप्रकाश सिंह, गणेश भगत, संतोष गंजले, भाजप कार्यकर्ते, पदाधिकारी आणि स्थानिक रहिवासी उपस्थित होते.
संध्याकाळी 5 .15 च्या सुमारास शिवण मित्र मंडळ, गडवाळी चाळ, आनंदगड, साने गुरुजी चाळ, पार्कसाईट, विक्रोळी (प) येथील नागरी सुविधा कामाचे भूमिपूजन करण्यात आले.
संध्याकाळी 5: 30 च्या सुमारास श्री. स्वयंभू सोमेश्वर मंडळ, सोमेश्वर नगर, पार्कसाईट, विक्रोळी (प) येथे संरक्षण भिंत बांधण्याचे भूमिपूजन करण्यात आले.
संध्याकाळी 6 च्या सुमारास पटेल चाळ कमिटी, गोळीबार रोड, घाटकोपर (प) येथील नागरी सुविधा कामाचे भूमिपूजन करण्यात आले.
संध्याकाळी 6:30 च्या सुमारास लालबत्ती हनुमान टेकडी, असल्फा, घाटकोपर (प) येथे संरक्षण भिंत बांधण्याच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले.
तसेच विक्रोळी येथे राम भजन कंपाऊंड, टागोर नगर येथील सुरेश यादव यांच्या नविन कार्यालयाचे उद्घाटनप्रसंगी श्री. सत्यनारायणाची महापूजा आयोजित करण्यात आली होती यावेळी भाजपचे असंख्य कार्यकर्ते, पदाधिकारी आणि स्थानिक रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ताजी बातमी व जाहीरातीसाठी संपर्क साधावा.
मोबा नं.9920601001
Info@surkshapolicetimes.com
dipakbhogal@surakashapolicetimes.com