बिरवाडीतील व्यापाऱ्यांनी बँक ऑफ महाराष्ट्र विरोधात पुकारलेल्या बेमुदत उपोषणास अखेर यश…!!!

0
Spread the love

प्रतिनिधी – श्री . किशोर कीर्वे
महाड : दिनांक 10 नोव्हेंबर 2021 रोजी सकाळी 11 वा.बँक ऑफ महाराष्ट्र बिरवाडी शाखे विरोधात बेमुदत उपोषणास बसलेल्या व्यापाराच्या मागण्या अखेर मान्य.

बँक ऑफ महाराष्ट्र मागण्या
बँक ऑफ महाराष्ट्र


महाड तालुक्यातील ग्रा. पं.बिरवाडी बाजारपेठेत 21 व 22 जुलै 2021 रोजी आलेल्या महापूरामध्ये व्यापाऱ्यांचे आतोनात नुकसान झाले होते त्यापैकी काही व्यापाऱ्यांनी बँक ऑफ महाराष्ट्र शाखा बिरवाडी मधून व्यवसायीक कर्ज घेतलेले होते कर्जाबरोबर बँकेने दुकानातील माल तारण करुन त्यावर फ्युचर जनरली कंपनीचा विमा उतरविलेला होता दरवर्षी प्रत्येकाच्या खात्यातून विमा हप्ता घेतला जात होता माञ बँकेच्या हलगर्जीपणामुळे यावर्षी मुदत संपलेली असताना सुद्धा विमा नुतनीकरण करण्यात आले नव्हते यामुळे व्यापाऱ्यांचे नुकसान होऊन सुद्धा त्यांना विमा कंपनीकडून विमाक्लेम नाकारण्यात आला असताना सर्व व्यापाऱ्यांनी बेमुदत उपोषण करण्याचा निर्णय घेतला बुधवार

बँक ऑफ महाराष्ट्र विरोधात पुकारलेल्या बेमुदत उपोषणास
बँक ऑफ महाराष्ट्र विरोधात पुकारलेल्या बेमुदत उपोषणास यश

दि.10 नोव्हेंबर 2021 रोजी बँक ऑफ महाराष्ट्र शाखा बिरवाडी समोर उपोषणाला बसण्यात आले यामध्ये व्यापारी 1)श्री.रोहन येरुणकर 2)श्री.सुधीर सोनार 3)श्री.राजेश कदम 4)श्री.राकेश मालुसरे 5)श्री.उदय म्हामुणकर 6)प्रकाश देशमुख सर्व राहणार बिरवाडी यांनी उपोषण केले या सर्व प्रकरणाची दखल घेऊन बँक ऑफ महाराष्ट्राचे झोनल मँनेजर श्री.सुरेंद्र देवकर नवी मुंबई यांनी संबंधीत विमा कंपनीशी चर्चा करुन दिनांक 10 नोव्हेंबर 2021 रोजी संबंधीत उपोषण करणाऱ्या व्यापाऱ्यांना लेखी पञ देऊन मागणी मान्य करण्यात आल्यामुळे व्यापाऱ्यांनी बेमुदत उपोषण मागे घेतले आहे.

ताजी बातमी व जाहिरातीसाठीसंपर्कः

मोबा.नं. 9920601001

info@surakshapolicetimes.com

dipakbhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट