बिरवाडी काळीज येथे एसटी बस आणि दुचाकी स्वराचा भीषण अपघातामध्ये खैरे येथील पोलीस पाटील राजेंद्र जाधव यांचा दुर्दैवी मृत्यू…

0
Spread the love

उपसंपादक – राकेश देशमुख

महाड

महाड तालुक्यामध्ये अपघाताच्या मालिका सुरूच असून आज सायंकाळच्या सुमारास बिरवाडी काळीज एम एम ए क्रीडांगणासमोर एसटी बस व दुचाकी स्वाराचा भीषण अपघात झाला आहे. एसटी बस आणि दुचाकी स्वार यांची समोरासमोर धडक होऊन हा अपघात झाल्याचे प्राथमिक माहिती समोर येत आहे. या अपघातामध्ये दुचाकीस्वार राजेंद्र जाधव यांचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला असून राजेंद्र जाधव हे खैरे गावचे पोलीस पाटील होते. शेवटची महाड वारंगी एसटी बस ही आपल्या दिशेने वारंगीकडे जात असताना दुचाकी स्वार आणि एसटी बस यांची समोरासमोर धडक होऊन हा अपघात झाल्याचं कळतंय. मे महिन्यामध्ये मुलीचं लग्न आणि बापाचा अपघाती मृत्यू झाल्यामुळे जाधव कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. घटनास्थळी महाशक्ती ॲम्बुलन्स आणि पोलीस प्रशासन दाखल झाले असून या संपूर्ण अपघाताचा तपास एमआयडीसी पोलीस करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट