मनमाडमध्ये फिल्मीस्टाईल पकडापकडी ..परराज्यातील प्रवाशांना लुटणाऱ्या बिहारच्या तिघांना टिळक नगर पोलीसांनी घातल्या बेड्या …

0
Spread the love

उपसंपादक-रणजित मस्के

टिळक नगर: टिळक नगर पोलिसांची धडक कारवाई..

मुंबईत आलेल्या परराज्यातील नागरिकांना लुटणारी तीन जणांची टोळी टिळक नगर पोलिसांनी मनमाडमध्ये जाऊन जेरबंद केली. या टोळीने गेल्या आठवड्यात लोकमान्य टिळक टर्मिनस बाहेर एका प्रवाशाला मारहाण करून त्याच्याकडील रोकड व त्याच्या बँक खात्यातील ४५ हजार वळते करून घेतले होते.

बिहारच्या सिरखिरिया येथे राहणारा राजकुमार सहानी (२३) हा त्याच्या वडीलांना भेटण्यासाठी मुंबईत आला होता. वडीलांना भेटल्यानंतर गुजरातला जाण्यासाठी तो ४ जानेवारी रोजी रिक्षाने लोकमान्य टिळक टर्मिनस येथे गेला. तेथे त्याला बिहारचे असलेल्या तिघांनी थांबवले व आपुलकी दाखवत राजकुमारला गुजरातचे तिकिट स्वस्तात मिळवून देऊ असे सांगत एका बाजूला नेले. मग दमदाटी करत राजकुमारच्या बॅगेतील चार हजारची रोकड व मोबाईल जबरदस्तीने काढून घेतला. तसेच त्याच्या मोबाईलमधील फोन पे द्वारे ४५ हजारची रोकड एका आरोपीने त्याच्या बँक खात्यात वळते केले आणि तेथून पळ काढला.

या प्रकाराविरोधात राजकुमारच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झाल्यानंतर वरिष्ठ निरीक्षक सुनील काळे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि राहुल वाघमारे, उपनिरीक्षक गोल्हर तसेच शिंदे, साटेलकर, सानप, रोंगटे, गायकवाड या पथकाने तपास सुरू केला. राजकुमारच्या फोनपे मधून फिनो बँकेतील एका खात्यात ४५ हजार वळते करण्यात आले होते. त्यामुळे वाघमारे यांनी वाशीला जाऊन बँकेतील त्या खात्याबाबत माहिती मिळवली असता तो खाते धारक मनमाडमध्ये असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पोलीसांनी मनमाड गाठून सद्दाम राईन, राजन सिंग आणि सिराज राईन या तिघा आरोपींना फिल्मी स्टाईलने पाठलाग करून पकडले. ते बिहारला पळून जाण्याच्या तयारीत होते. पण टिळक नगर पोलिसांनी त्यांना गजाआड केले.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः

मोबा.नं. 9920601001

info@surakshapolicetimes.com

diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट