दिवा पूर्व चौकात सायंकाळी ७ ते रात्री ९ या वेळेत वाहतूक पोलीस नेमणूक करण्यात मनसे शहर अध्यक्ष श्री. तुषार भास्कर पाटील यांना मोठे यश..

0
WhatsApp Image 2023-12-14 at 12.09.37 AM
Spread the love

प्रतिनिधी- अभिजित माने

दिवा :-दिवा शहरातील वाहतूक कोंडी हा जटिल प्रश्न झाला आहे. दिवा स्टेशन मार्गावर येवले चहा समोरील चौकात दररोज मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असते दिवा स्टेशन कडून आगासन गावं आणि शीळ फाट्याकडे जाणाऱ्या वाहनांची वाहतूक ही येवले चहा समोरील चौकात एकत्र होते.

शीळ फाट्यावरून डोंबिवली कडे जाणारी वाहतूक ही कल्याण शीळ रस्त्यावर आलेली वाहतूक कोंडी टाळण्यासाठी दिवा शीळ रस्त्यावरून मानपाडा मार्गे डोंबिवली जातात.

त्यामुळे वाहनांच्या संख्येत मोठी भर पडते.त्यामुळे बेशिस्त वाहनचालकांमुळे वाहतूक कोंडीत अजून भर पडते.यामुळे रस्त्यावर चालणाऱ्या स्थानिक व जेष्ठ नागरिकांना रस्ता ओलांडणे असंभव होते.ह्या अश्या काही गोष्टी मनसे पदाधिकारी यांच्या निदर्शनास आल्या आणि त्यांनी हा निर्णय घेतला. व त्यांच्या मागणीस आज मोठे यश मिळाले आहे.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट