महाराष्ट्र, तेलंगणामध्ये घरफोडी करणारे दोघांकडून १२ गुन्ह्यांची उकल करण्यात महात्मा फुले चौक पोलीसांना मोठे यश..

उपसंपादक-रणजित मस्के
कल्याण:-कल्याण : महाराष्ट्र व तेलंगणा राज्यात घरफोड्या करणाऱ्या दोघांना जेरबंद करण्यात आले. ही कारवाई ठाणे पोलीस दलाच्या कल्याणमधील महात्मा फुले चौक पोलिसांनी केली. या कारवाईमुळे कल्याण, जळगाव व तेलंगणातील १२ गुन्हे उघडकीस आले आहेत.
महात्मा फुले चौक पो स्टे. कल्याण हद्दीत २७ फेब्रुवारी २०२४ रोजी दीडच्या सुमारास हेमंत रामदास सांगळे (वय ४२, रा. कल्याण पश्चिम) यांच्या राहत्या घराच्या दरवाजाचा कडीकोयंडा तोडून चोर आत शिरले. त्यांनी हॉलमधील लाकडी कपाटात ठेवलेले ४९ हजार २६० रुपयांचे ७ ग्रॅम, ३२० मिली वजनाचे कानातील दोन सोन्याचे झुमके, ९ हजारांची रोकड रक्कम असा एकूण ५८ हजार २६० रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला. या प्रकरणी महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात (गुन्हा रजि. नं. २१४/२०२४ भा.द.वि. कलम ४५७,३८०,३४) गुन्हा दाखल करण्यात आला.
या गुन्ह्याचा तपास वपोनि शैलेश साळवी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी व अंमलदार करू लागले. तांत्रिक माहितीच्या आधारे तपास सुरू असताना पोलिसांना आरोपीची माहिती प्राप्त झाली. त्यानुसार अविनाश धनाजी शिंदे (वय २५, रा. अंबरनाथ पुर्व जि. ठाणे) याच्या अंबरनाथमध्ये मुसक्या आवळल्या. त्याची कसून चौकशी केली असता त्याने साथीदार सॅमसंग रूबीन डॅनियल (वय२५, रा, कल्याण (प.), जि. ठाणे) याच्यासोबत सांगळे याच्या घरासह १२ ठिकाणी चोऱ्या केल्याची कबुली दिली. त्या माहितीच्या आधारे डॅनियललाही अटक करण्यात आली. हे दोघे पोलिसांच्या हाती लागल्याने कल्याण, जळगाव व तेलंगणा राज्यातील चंदानगर, यलाल पोलिस ठाणे, तांडुर टाऊन पोलिस ठाणे, व पंजगुट्टा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील १२ घरफोडी चोरीचे गुन्हे उघकीस आले आहेत.
या गुन्ह्यातील मुख्य आरोपी सॅमसंग रूबीन डॅनियल सराईत गुन्हेगार असून त्याच्या विरुद्ध ९ घरफोडी गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले. नमुद आरोपीत हे आंतरराज्य घरफोडी चोरीचे गुन्हे करणारी टोळी असून त्यांनी महाराष्ट्र, तेलंगणा राज्यात घरफोडी चोऱ्या केल्या असून इतर राज्यातही घरफोडी चोऱ्या केल्याची शक्यता असून त्याप्रमाणे तपास सुरू आहे. या आरोपीकडून ३ लाख ६२ हजार २६० रुपयांचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत.
ही कौतुकास्पद कारवाई अपर पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे, परिमडळ ३ चे उपायुक्त सचिन गुंजाळ, एसीपी कल्याणजी घेटे यांच्या मार्गदर्शनाखाली वपोनि शैलेश साळवी, पोउपनि किरण भिसे, सपोउपनि विजय भालेराव, हवालदार कदम, साळुंखे, तडवी, टिकेकर, अंमलदार मधाळे, वडगावे, कोळी यांनी केली.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com