बोईसर पोलीस ठाणे येथील दाखल घरफोडीच्या गुन्ह्याची उकल करण्यात बोईसर पोलीस ठाणे यांना मोठे यश…

0
Spread the love

उपसंपादक – रणजित मस्के

पालघर :-

दि.२४/०७/२०२३ रोजी फिर्यादी नामे श्री. अमोल मच्छिंद्र थोरात, वय-३१ वर्षे व्यवसाय नोकरी (इन्स्टाकार्ट सर्व्हिसेस प्रा.लि. शाखा बोईसर), रा. रुम नं. १०५ वी विंग रिद्धी सिद्धी अपार्टमेंट, पाठीमागे अगामी सोसायटी, खैराफाटक, बोईसर पूर्व यांनी फिर्याद दिली की, दि.२३/०७/२०२३ रोजी २३.४५ वा. ते दि.२४/०७/२०२३ रोजी सकाळी ०५.१२ वाजेच्या दरम्याण अंगात रेनकोट व डोक्यात हेल्मेट घातलेल्या दोन अनोळखी इसमांनी फिर्यादी हे कार्यरत असलेल्या इन्स्टाकार्ट सर्व्हिसेस प्रा.लि. शाखा बोईसर च्या गाळा नं. ११ चे शदरचे लॉक कशाच्या तरी सहाय्याने तोडुन व शटर उचकटुन त्यावाटे आतमध्ये प्रवेश करून आतमधील कपाटाचे लॉक तोडून कपाटातील लॉकरमध्ये असलेली रोख रक्कम १०,५१,०००/- रुपये व ३,७७,१८५ रुपये किमतीचे वेगवेगळ्या कंपनीचे मोबाईल फोन, इलेक्ट्रीक वस्तू व सौंदर्यप्रसाधने असा एकूण १४,२३,१८५/- रुपये किमतीचा मुद्देमाल घरफोडी चोरी करून नेलेबाबत बोईसर पोलीस ठाणे येथे गु.र.नं. २९६/२०२३ भा.द.वि.स. कलम ४५७, ३८०, ४२७, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सदर गुन्हयाचे गार्भीय लक्षात घेऊन श्री. बाळासाहेब पाटील, पोलीस अधीक्षक, पालघर, व श्री. पंकज शिरसाठ, अपर पोलीस अधीक्षक, पालघर यांनी श्री. नित्यानंद झा, सहा. पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी, बोईसर विभाग व श्री. उमेश पाटील, पोलीस निरीक्षक, बोईसर पोलीस ठाणे यांना तपासाबाबत मार्गदर्शन करून तपास करण्याच्या सूचना दिल्या. त्याप्रमाणे श्री उमेश पाटील, पोलीस निरीक्षक, बोईसर पोलीस ठाणे यांनी बोईसर पोलीस ठाणे गुन्हेप्रकटीकरण शाखेचे अधिकारी पोउपनि / विठ्ठल मणिकेरी यांचेसह पोलीस पथक तयार केले.

सदर पथकाने तांत्रीक कौशल्याच्या आधारे तसेच गुप्त बातमीदारामार्फत आरोपीतांचा माग घेऊन
आरोपी क्र.
१) स्वप्नील रमेश पाटील वय २८ वर्षे २) स्वप्नील सतीश पाटील, वय २४ वर्षे, दोन्ही रा. गायत्रीनगर दरसमाळ, केळवे रोड ता. जि. पालघर यांना आरोपी क्र. १) यास बोईसर येथील यशवंतसृष्टी परीसरातून व आरोपी क्र. २) यास केळवे येथून ताब्यात घेऊन त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता त्यांनी वरील गुन्हा केल्याचे कबूल केले आहे. आरोपी यांना अटक करून त्यांचेकडून वरील वर्णनाचा व किमतीचा गेला एकूण १४,२३,१८५/- रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याचा अधिक तपास हा पोउपनि / विठ्ठल मणिकेरी, बोईसर पोलीस ठाणे हे करीत आहेत.

सदरची कामगिरी श्री. बाळासाहेब पाटील, पोलीस अधीक्षक, पालघर, श्री. पंकज शिरसाठ, अपर पोलीस अधीक्षक, पालघर, श्री. नित्यानंद झा, सहा. पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी, बोईसर विभाग यांचे मार्गदर्शनाखाली श्री. उमेश पाटील, पोलीस निरीक्षक, बोईसर पोलीस ठाणे, पोउपनि / विठ्ठल मणिकेरी, पोहवा / सुरेश दुसाणे, पोहवा / शरद सानप, पोहवा / विजय दुबळा, पोहवा / राहुल पाटील, पोना / योगेश गावीत, पोना / रमेश पालवे, पोशि/ संतोष वाकचौरे, पोशि/ देवेंद्र पाटील, पोशि/ चिरज साळुंखे, पोशि/ मयूर पाटील, पोशि/मच्छिद्र घुगे, पोशि/ राहुल क्षेत्रीय, पोशि/ सागर जाधव सर्व नेमणूक बोईसर पोलीस ठाणे यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट