बीडचे स.पो.अधिक्षक श्री. पंकज कुमावत यांनी अवैध धंदेवाल्यांची उडवली झोप ..?

0
Spread the love

बीड : गुरुवार दिनांक 16 डिसेंबर 2021 रोजी परळी तालुक्यातील सिरसाळा येथील झन्ना मन्ना जुगार अड्डय़ावर छापा टाकून अवैध
धंदेवाल्याची झोप उडविली आहे.

पोलीस अधीक्षक श्री. पंकज कुमावत यांनी केज उपविभागाचा पदभार घेतल्यापासून गुटखा, जुगार, दारु, वाळू अशा विविध अवैध धंद्यांवर कारवाया धडाका सुरुच ठेवला आहे. परळी तालुक्यातील सिरसाळा येथे 2 ठिकाणी जुगार अड्ड्यावर छापे मारले. यावेळी 22 जुगाऱ्यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडी रोख रक्कम, जुगाराचे साहित्य असा एकूण 7 लाख 61 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

सिरसाळा परिसरामध्ये झन्ना मन्ना नावाचा जुगार खेळताना कुंडीबा आरसुळे, जीवन मुळे, नवनाथ कदम, राजेंद्र मुसळे, विलास गायकवाड, पांडूरंग गुट्टे, मोहम्मद शेख, महादेव गडदे, सुभाष केकान, महादेव सांगळे, असेफ पठाण, पांडूरंग काळे, गोविंद कदम, दत्तात्रय अंभुरे, बाळकृष्ण गव्हाणे, शेख अब्दुल,शेख शफीक, अशोक नायबळ, ओंकार मुठाळ, प्रकाश पौळ, संतोष कदम, शामराव चव्हाण, धम्मानंद किरवले, सुधाकार दातार, सय्यद चाँद यांच्यांवर सिरसाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या धडाकेबाज कारवायामुळे अवैध धंदेवालयाची चांगलीच धांदल उडाली आहे. ही कारवाई सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत, उपनिरीक्षक कुलकर्णी, पो.ह.बालाजी दराडे, पो.ह.बांगर, पो.ना.भंडाणे, पो.ना.वंजारे, शेंडगे, पो.ना.दिलीप गित्ते, शेख, महादेव बहिरवाळ यांनी ही कारवाई केली.आणि यापुढेही अवैध धंदेवाईकांची गय केली जाणार नाही असे मत स.पो.अधिक्षक श्री. पंकज कुमावत यांनी व्यक्त केले आहे.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः

मोबा.नं. 9920601001

info@surakshapolicetimes.com

dipakbhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट