बिबवेवाडी पोलीसानी दाखल गुन्ह्यातील जप्त मुद्देमाल फिर्यादीस केला परत, त्यांनी मानले पोलीसांचे आभार..

0
Spread the love

सह संपादक – रणजित मस्के

पुणे

दि.२३.०५.२०२४ रोजी २३/०० वा ते दिनांक २४/०५/२०२४ रोजी ०८/०० वा. चे दरम्यान चे काळात फिर्यादी श्रीनिवास श्रीकांत रेवले, वय ५३ वर्षे, रा. गणेश गार्डन, बिबवेवाडी पुणे यांचे मामा नामे जितेंद्र गंगाधर साखरे यांचे मालकीचा असलेला फ्लॅट नं. ११, गुंफन अपार्मेंट सर्व्हे नं. ५७३ बिबवेवाडी पुणे ३७. याचे लोखंडी ग्रिलचे दरवाजाचा व त्याच्या आतील लाकडी दरवाजाचा असे दोन्ही दरवाज्याचे कोयंडे कापुन त्यावाटे घरामध्ये प्रवेश करुन मास्टरबेडरुम मधील लाकडी कपाटाचे लॉकर कशाचेतरी साह्याने उचकटुन कोणीतरी अज्ञात इसमांनी घरफोडी चोरी करुन नेला आहे म्हणून फिर्यादी यांनी तक्रार दिलेने बिबवेवाडी पोलीस ठाणे गुन्हा रजि. १३२/२०२४ ना.दं.वि.सं.कलम ४५४,४५७,३८० अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता.

दाखल गुन्हयातील आरोपी नामे १) विकीसिंग जालिंदरसिंग कल्याणी वय ३५ वर्षे रा. साईबाबा मंदिराजवळ, सर्व्हे नं. ११०, रामटेकडी हडपसर पुणे. २) अब्दुला ताहिरबक्ष शेख, वय ५८ वर्षे रा. फ्लॅट नं.७१७, पनामापार्क सोसायटी, पोरवाल रोड, धानोरी पुणे यांचेकडे तपास करून गुन्हयातील ५,२५,०००/-कि.रू चे एक सोन्याची लगड वजन ९५ ग्रॅम ची हस्तगत करून गुन्हा उघडकीस आणलेला होता.

सदरची लगड मा प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी सो. कोर्ट क्र ४, शिवाजीनगर पुणे यांचे आदेशान्वये वरिष्ठ पोलीस निरीक्षक बिबवेवाडी पोलीस स्टेशन यांचे हस्ते अर्जदार जितेंद्र गंगाधर साखरे यांचे ताब्यात दिली असता त्यांनी पोलीसांचे आभार मानले आहेत.

सदरची कामगिरी मा. अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग, पुणे श्री मनोज पाटील मा. पोलीस उप आयुक्त, परि ५ डॉ. राजकुमार शिंदे, मा. सहा. पोलीस आयुक्त, वानवडी विभाग श्री. वन्यकुमार गोडसे, यांचे मार्गदर्शनाखाली, बिबवेवाडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. शंकर साळुंखे, तपास पथकातील अधिकारी पोलीस उप निरीक्षक अशोक येवले, महिला पोलीस अंमलदार मुजुमले, जाधव, पोलीस अंमलदार पाटील, चिकणे, वलटे, शेंद्रे, साळुंखे यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट