बिबवेवाडी पोलीसांनी सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करुन 2 जणांना ठोकल्या बेडया

0
Spread the love

पुणे: बिबवेवाडी येथील,रासकर पॅलेस या उच्चभ्रु सोसायटीत सुरु असलेल्या सेक्स रॅकेटाचा बिबवेवाडी पोलिसांनी पर्दाफाश केला असून तेथील दोन पिडित महिलांची सुटका करण्यात आली आहे आणि हा वेश्या व्यवसाय चालविणाऱ्या 2 जणांना अटक करण्यात आली आहे.श्री. महेंद्र ज्ञानाराम प्रजापती (वय ३४, रा. सुपर इंदिरानगर, बिबवेवाडी, मुळ गाव सोजत, जि. पाली, राजस्थान)आणि श्री. पांडुरंग लक्ष्मण शिंदे (वय ४६, रा. अप्पर इंदिरानगर, बिबवेवाडी) असे अटक केलेल्या 2 एजंटांची नावे आहेत.

बिबवेवाडी पोलीस ठाण्यातील तपास पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक श्री.राजेश उसगांवकर यांना बिबवेवाडी येथील रासकर पॅलेस या उच्चभ्रु सोसायटीत वेश्या व्यवसाय सुरु असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार, पोलिसांनी एक बनावट ग्राहक पाठवून खातरजमा केली. त्यानंतर तेथे छापा टाकण्यात आला. तेथे वेश्या व्यवसाय करुन घेणाऱ्या दोन महिलांना ताब्यात घेण्यात आले. तसेच दोघा एजंटांना अटक करण्यात आली. कारवाईच्या वेळी रोख ४ हजार रुपये, 3 मोबाईल तसेच इतर साहित्य जप्त करण्यात आला. पिडित महिलांना हडपसर येथील रेस्क्यु फाऊंडेशन येथे सरंक्षणार्थ ठेवण्यात आले आहे. सदर कारवाई पोलीस उपायुक्त श्रीमती. नम्रता पाटील, सहायक पोलीस आयुक्त श्री. राजेंद्र गलांडे, बिबवेवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. सुनिल झावरे,पोलीस निरीक्षक श्रीमती अनिता हिवरकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक श्री. राजेश उसगांवकर, उपनिरीक्षक श्रीमती प्रिया राजगुरु, सहायक पोलीस उपनिरीक्षक श्री. दीपक मते, पोलीस अंमलदारश्री. श्रीकांत कुलकर्णी, श्री.सतिश मोरे,श्री. तानाजी सागर, महिला पोलीस शिपाई बागवान, परकाळे यांनी केली .

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः

मोबा.नं. 9920601001

info@surakshapolicetimes.com

dipakbhogal@surakshapolicetimes.com

बिबवेवाडी पोलीसांनी सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करुन 2 जणांना ठोकल्या बेडया

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट