बिबवेवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री शंकर साळुंखे यांचे परिमंडळ -५ येथे सेवानिवृत्ती कार्यक्रम संपन्न..

सह संपादक -रणजित मस्के
पुणे
दि. ३1.०५.२०२५ रोजी परिमंडळ ५ हद्दीतील बिबवेवाडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री शंकर साळुंखे हे वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले असल्याने त्यांच्या सेवानिवृत्तीचा समारंभ कार्यक्रम पोलीस आयुक्त परिमंडळ पाच कार्यालयात पार पाडला असून सदर कार्यक्रमासाठी आम्ही स्वतः परिमंडळ ५ मधील २ सहाय्यक पोलीस आयुक्त तसेच ९ वरिष्ठ पोलीस निरीक्षक, परिमंडळ 5 कार्यालयातील अधिकारी व अंमलदार तसेच पोलीस स्टेशनचे डीओ,एटीएस व गोपनीय अंमलदार हजर होते.




श्री शंकर साळुंखे यांनी त्यांच्या नोकरीमध्ये पोलीस दलाला दिलेल्या सेवेबद्दल पोलिसांच्या वतीने कार्यक्रमास उपस्थित असणाऱ्या त्यांच्या पत्नी व मुलगा यांचे ही आभार मानून त्यांच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या .
सदर वेळी सहा. पोलीस आयुक्त वानवडी तसेच पोलीस निरीक्षक(गुन्हे) बिबबेवाडी व गोपनीय अंमलदार यांनी मनोगत व्यक्त केले.
त्यानंतर सदर कार्यक्रमांमध्ये चहापान करून कार्यक्रम संपन्न झाला.